अमरावती : जिल्ह्यात गुरुवारी उपचारादरम्यान १५ संक्रमितांचा मृत्यू झाल्याने कोरोनाग्रस्त मृतांची संख्या १,४१४ झालेली आहे. याशिवाय दोन अन्य जिल्ह्यांतील रुग्णांचा मृतात समावेश आहे. जिल्ह्यात नव्या ४५५ पॉझिटिव्हची नोंद झाल्याने संक्रमितांची एकूण संख्या ९०,५३० झालेली आहे.
जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार गुरुवारी उपचारादरम्यान ८५ वर्षीय महिला, कारंजा घाडगे, ७० वर्षीय पुरुष, नांदगाव खंडेश्वर, ६६ वर्षीय पुरुष, कांडली, ७५ वर्षीय पुरुष, परतवाडा, ४४ वर्षीय पुरुष, कांडली, परतवाडा, ४६ वर्षीय महिला, रविनगर, अमरावती, ४१ वर्षीय पुरुष, शिंदी, अचलपूर, ५३ वर्षीय महिला, अचलपूर, ६० वर्षीय महिला, परतवाडा, ४९ वर्षीय महिला, नायगाव, ६५ वर्षीय पुरुष, वरूड, ४९ वर्षीय पुरुष, माळवेशपुरा, अचलपूर, ७० वर्षीय पुरुष, चांदूर रेल्वे, ७० वर्षीय पुरुष, अचलपूर व ४० वर्षीय महिला, सुकळी याशिवाय ४८ वर्षीय पुरुष, तळेगाव पंत, आष्टी, वर्धा, ७५ वर्षीय महिला, कोळंबी, मूर्तिजापूर, अकोला या रुग्णांचा मृत्यू झाला.