अमरावती : जिल्ह्यात शनिवारी उपचारादरम्यान २० रुग्णाचा मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या १,२३३ वर पोहोचली आहे. याशिवाय वर्धा जिल्ह्यातील एक रुग्णाचा मृत्यू झाला. शनिवारी पुन्हा १,०९७ पॉझिटिव्हची नोंद झाल्याने जिल्ह्यात संक्रमितांची संख्या ८१,७५५ झालेली आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढता असतांना मृत्यूचे सत्र सुरूच आहे. याशिवाय चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हिटी वाढतीच आहे. शनिवारी ४,२४५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २५.८४ टक्के झालेली पॉझिटिव्हिटीची नोंद चिंताजनक आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या माहितीनुसार उपचारानंतर बरे वाटल्याने शनिवारी उच्चांकी १,१६७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. एकूण कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत उपचारानंतर बरे झालेल्या नागरिकांचे प्रमाण ८५.२८ टक्के आहे. याशिवाय जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण १.५१ टक्के आहे.
ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता संसर्ग असल्याने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी हॉटस्पॉट तालुक्यांचा दौरा केला व तेथील नागरिक व आरोग्य विभागाचे डॉक्टर्स व कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. याशिवाय शनिवारीदेखील महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागातील अधिकाऱ्यांचा व्हीसीद्वारे आढावा घेतला आहे.
बॉक्स
शनिवारी २४ तासांतील मृत्यू
(कृपया पाच ओळी जागा सोडावी)