अमरावती : कोरोनाच्या वाढत्या संसर्गात विविध आजारांचे रुग्ण घरीच बसलेले आहेत. त्यात कोरोनाच्या भीतीने यंदाही कडाक्याच्या उन्हातही उष्माघात पडल्याचे चित्र आहे. ऊन लागले तरीही रुग्णांनी दवाखान्यात न जाता घरीच उपचार घेतले. त्यामुळे यंदा आरोग्य विभागाला उष्माघात कक्षाचा विसर पडल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात एप्रिल व मे महिन्याच्या दरम्यान तापमान साधारणत ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाते. त्यामुळे आरोग्य विभागाकडून मार्चमध्येच उष्माघात कक्ष तयार केला जातो. जिल्हा सामान्य रुग्णालयासह, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून दिली जाते. कर्मचाऱ्यांना उष्माघाताचा रुग्ण आल्यास रुग्णावर उपचाराबाबत सूचना देऊन त्यांना प्रशिक्षणही दिले जाते. यंदा मात्र कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने कडाक्याच्या उन्हातही उष्माघात कक्ष उभारण्यात आल्याचे दिसून येत नाही. गतवर्षी एप्रिलअखेर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. दरम्यान त्या काळात जिल्ह्यातील तापमान नाही ४० ते ४१ अंश सेल्सिअसच्या वर गेले होते. वाढत्या उन्हाचा तडाखा लक्षात घेता आरोग्य यंत्रणेकडून खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन केला जातो. परंतु, यंदा तशा उपाययोजना केल्याचे दिसले नाही. दरवर्षी मे महिन्यात भीती वाटणाऱ्या उन्हाचा यंदा कोरोनाच्या भीतीने चटकाच लागला नाही.
बॉक्स
मे महिन्याच्या प्रारंभी वाढले होते तापमान
जिल्ह्यात एप्रिलअखेर आणि मे महिन्याच्या सुरुवातीला तापमानात वाढ झाली होती. साधारणत: ३८ ते ३९ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढले होते. मात्र, त्यावेळी उष्माघात कक्ष उभारणे विषयी नियोजन झालेले नाही. यंदा एप्रिल महिना होट जाणवला. मात्र कोरोना पुढे सर्वसाधारण आजार थंड पडले आहेत.
कोट
प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर उष्माघात कक्ष स्थापनेबाबत सूचना दिल्या होत्या.परंतु कोरोनाचा वाढता संसर्ग असतांना या दरम्यान जिल्ह्यात उष्माघाताचा रूग्ण उपचारासाठी आलेला नाही.रूग्ण आल्यास त्यावर उपचारासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे.
डॉ.दिलीप रणमले
जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉक्टर दिलीप रणमले
जिल्हा आरोग्य अधिकारी