अमरावती/ संदीप मानकर
कोरोनाकाळात लॉकडाऊनमध्ये रेल्वे, बसेस, तसेच सार्वजिनक वाहतूक सेवा वाहतूक बंद होती. त्यामुळे नागरिकांना ये- जा करण्याकरिता कुठलेही साधन नव्हते. आता बसेस, रेल्वे जरी सुरु झाल्या असल्या तरी त्यात गर्दी होवून आपल्याला किंवा परिवाराला कोरोना तर होणार नाही ना? अशी भिती नागरिकांच्या मनात अद्यापही कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रवासी वाहतुकीला ब्रेक देत आता घराघरात चारचाकी व दुचाकी वाढल्या आहेत. कोरोनाकाळात अमरावती प्रादेशिक परिवहन कार्यालयात हजारो नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे.
परिवाराच्या सुरक्षितेकरीत किंवा प्रवासी वाहनात होणारी गैरसोय टाळण्यासाठी अनेक नागरिकांनी कार खरेदीला पसंती दर्शविली असून, या काळात आरटीओकडे हजारो नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे.
२०२१ या वर्षात आतापर्यंत ४ हजार १२८ नागरिकांनी नवीन कार खरेदी केली आहे तर २९ हजार ४९१ जणांनी नवीन दुचाकींची खरेदी करून त्याची आरटीओकडे नोंदणी केली आहे. १६८ जणांनी ऑटोची खरेदी केली तर १८ जणांनी टॅक्सी कार खरेदी केली.
२०१९
दुचाकी - ४०,८३०
चारचाकी- ३,९९०
२०२०
दुचाकी- ३९,४१७
चारचाकी- ४०८२
२०२१
दुचाकी- २९,४९१
चारचाकी- ४,१२८
२०१९
ऑटो- १८४५
टॅक्सी कार- ५३
२०२०
ऑटो- १२४८
टॅक्सी कार- ३८
२०२१
ऑटो- १६८
टॅक्सी कार- १८
म्हणून घेतली चारचाकी
कोट
म्हतारे आई-वडिल आहेत. त्यांना कधीकधी दवाखान्यात सुद्धा न्यावे लागते. तसेच खासगी प्रवासी वाहतूक आता फारशी नाही. फॅमिलीच्या सुरक्षीतेकरीता व गैरसोय टाळण्याकरिता नवीन कार खरेदी केली आहे.
शैलेद्रसिंह ठाकूर, कार खरेदीदार अचलपूर
कोट
कोरोनाकाळात बसेस, रेल्वे व इतर वाहतूक बंद होती. त्यामुळे तातडीने वाहन लागल्यास इतर वाहतुकींवर अवलंबून राहावे लागत होते. त्यांनी दर सुद्धा वाढविले होते. मात्र आता कार घेतल्याने यापुढे होणारी गैरसोय टाळता येणे शक्य होईल.
- एक कार खरेदीदार
ऑटोचालक - टॅक्सीचालक परेशान
दोन कोट आहे.