आरटीपीसीआर ६०० ९०० ८५०
अँटीजेन २०० २५० ५००
एजंटांची टक्केवारी वेगळीच
कोरोना टेस्ट करण्यासाठी काही लोकांना सेंटरची माहिती नसल्याने तसेच शासकीय सेंटरवर गर्दी वाढल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने खासगी सेंटरवर तपासणी करावी लागली. त्यासाठी संपर्कातील व्यक्तींद्वारा एजंट शोधला जातो. तसे तपासणीचे ९०० रुपये, घरून स्वॅब नेण्याचे व अहवाल आणून देण्याचे कमिशन मिळून एका रुग्णाकडून २४०० रुपये आकारण्यात आल्याचे एका रुग्णाने सांगितले.
--
त्यांच्यावर नियंत्रण कुणाचे?
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने कोरोना चाचणीसंदर्भात खासगी पॅथालॉजीचे दर निश्चित केले असले तरी नागरिकांची गरज पाहून काही पॅथालॉजीमध्ये आगाऊ दर आकारण्यात आल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे यावर नियंत्रण असायला हवे, अशी प्रतिक्रिया नागरिकांच्या आहेत.