जिल्ह्यात दरवर्षी सामूहिक विवाह सोहळे होत होते. यामध्ये गोरगरीब आपल्या मुला-मुलींचा विवाह अल्प खर्चात आणि अनुदानाचा मिळणार असल्याने सहभागी व्हायचे. त्यामुळे विवाह नोंदणीचा आकडा मोठा राहत असे. मात्र, सन २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव ऐन एप्रिल महिन्यात झाल्याने भीतीपोटी अनेकांनी नियोजित विवाहाची तारीख पुढे ढकलली, काहींनी रद्द केले, तर काहींचा पाहणीचाही कार्यक्रम होऊ शकला नाही. परिणामी विवाह कमी झाल्याने यंदा जन्मदरातदेखील घट झाली आहे. सन २०१९ मध्ये जिल्ह्यात ५०२३ विवाह झाले, तर सन २०२० मध्ये ४८१५ विवाह शॉर्टकट पद्धतीने उरकण्यात आले. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा २०८ विवाह कमी झाल्याचे चित्र आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार हा आकडा वाढता असायला हवा होता. परंतु कोरोनामुळे अनेकांनी विवाह पुढे ढकलल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
बॉक्स
वर्षे जन्मदर मृत्यूदर विवाह नोंदणी
२०१८ १३.३४ ७.३४ ४८९३
२०१९ १२.९३ ७.८३ ५०२३
२०२० १२.०१ ७.६९ ४८१५
--
लॉकडाऊनमुळे रुग्णांची संख्या कमी
कोरोना विषाणूचा संसर्ग एकमेकांच्या संपर्कात आल्याने होतो, हे शासनाच्या निदर्शनास येताच त्रिसूत्रीत्या पालनासंबंधी सक्ती लावण्यात आली. तसेच गर्दी ओढवणाऱ्या अनेका विभागच बंद करण्यात आले. नागरिकांचा संपर्क तुटण्याकरिता कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आले. परिणामी आक्टोबर ते डिसेंबर दरम्यान कोरोनाचे रुग्ण फार कमी झाले होते. मात्र, दैनंदिन कामानिमित्त अनेकांचा विविध विभागाशी संपर्क वाढल्याने व नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याने पुन्हा संक्रमणात झपाट्याने वाढ झाली. आता पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्यात आला असताना संक्रमणाचे प्रमाण मात्र तेवढेच दिसत आहे.