अमरावती : जिल्ह्यात रविवारी सात कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या ५६२ झाली आहे. याशिवाय ४४६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३९,५२४ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात यापूर्वी १४ फेब्रुवारीला ३९९ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली होती व त्यानंतर तीन आठवड्यांनी रविवारी ४४६ रुग्णांची नोंद झाली. मात्र, कालावधीत मृतांची संख्या वाढतीच आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तब्बल ३,७०८ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली, तर याच कालावधीत ४१ रुग्णांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन व्हावे, याकरिता सोमवारपासून २० पथकांचा वॉच शहरात राहणार आहे. नियमभंग करणाऱ्यांवर दंडनीय कारवाई केली जाणार आहे. उपचारानंतर बरे वाटल्याने रविवारी ७४४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ३२,२९९ रुग्ण संक्रमणमुक्त झाले आहेत. एकूण कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत रिकव्हरीचा प्रमाण ८१.७२ टक्के आहे. सद्यस्थितीत मृत्यूचा दर हा १.४२ टक्के, तर १३४० रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. याशिवाय महापालिका क्षेत्रात ३,७३२ व ग्रामीणमध्ये १,५९१ रुग्णांनी होम आयसोलेशन या सुविधेचा लाभ घेत असल्याने जिल्ह्यात ६,६६३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
बॉक्स
रविवारचे मृत्यू
(कृपया चार ओळी जागा सोडावी, माहिती यायची आहे)