अमरावती : कोरोना संसर्गामुळे ज्या बालकांनी पालक गमाविले त्यांना मदतीची घोषणा चार दिवसांपूर्वी शासनाने केली. मात्र, ज्या पालकांनी एकमेव अपत्य कोरोनामुळे गमावले, त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशा माता-पित्यांना मदतीबाबत अद्याप कोणतेच शासन धोरण नसल्याने हे कुटुंब संकटात सापडले आहे. आम्हाला मदत केव्हा, अशा या पालकांचा सवाल आहे.
किल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाबाधितांची संख्या ९४ हजारांच्या घरात आहे. यामध्ये कित्येकांनी आपल्या जवळचे नातलग गमावले आहे. कुटुंबाची कुटुंबं दुसऱ्या लाटेत पाॅझिटिव्ह आलीत. यात काहींनी एकुलता एक मुलगा कोरोनात गमावलेला. दुसऱ्या लाटेत अनेक तरुणांना जीव गमवावा लागला. दुखणे अंगावर काढणे, चाचणीला उशीर होणे. याशिवाय अन्य कोमार्बिडीटी आजार अशी अनेक कारणे आहेत. मात्र, ज्या कुटुंबाने कर्ता पुरुष गमावला त्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे अशा परिवारांना शासन मदत मिळायला पाहिजे, अशी समाजभावना आहे.
पाईंटर
कोरोनाचे एकूण रुग्ण : ९४,०८१
उपचारानंतर बरे : ८९,१६०
सध्या उपचार सुरू : ३,४२०
संक्रमितांचे मृत्यू : १,५०१
बॉक्स
या कुटुंबावर कोसळले आभाळ
१) एकुलता एक मुलगा गमाविल्याने सून व नातवंडाची जबाबदारी वृद्ध पालकांवर आलेली आहे. कर्ता मुलगा गमाविल्याने कुटुंबाचा आधार गमाविलेला आहे.
२) मुलगा गमाविल्याने उतरत्या वयात वृद्ध माता-पित्यांवर आभाळ कोसळले आहे. येणाऱ्या काळातील अडचणींमुळे त्यांना आता शासनाचा आधार हवा आहे.
३) जिल्ह्यात किती कुटुंबांनी त्यांचा एकुलता एक मुलगा गमावला अशा परिवारांची माहिती जिल्हा प्रशासनाजवळ उपलब्ध नाही. त्यामुळे याविषयी तात्काळ सर्व्हेक्षण होणे महत्त्वाचे आहे.
बॉक्स
या कुटुंबांना शासनाधार महत्त्वाचे
कोरोना संकटात कुटुंबातील अनेक सदस्य संक्रमित झाल्याने जवळ येत नव्हते, होते ते संपले आहे. उपचारही महागडा आहे. त्यात कुटुंबाचा कर्ता गमावला. त्यामुळे या कुटुंबाला सर्व काही शून्यातून उभारावे लागणार आहे. आजारपणात कर्ज अंगावर झाले. जगायचे कसे हा प्रश्न अनेक कुटुंबांसमोर निर्माण झालेला आहे. या कुटुंबाला शासनाने मदत द्यावी, व्यवसायासाठी अनुदान व द्यावे व अशा परिवाराचे तात्काळ सर्वेक्षण करण्याची गरज आहे.