अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी होत चालला असला तरी मृत्यूची आकडेवारी ही धक्कादायक ठरत आहे. आरोग्य यंत्रणेच्या माहितीनुसार, गत २४ तासांत ४९६ संक्रमित निष्पन्न झाले, तर १३ रुग्णांचे मृत्यू झाला. आतापर्यंत ९१ हजार २६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची नोंद करण्यात आली.
मृतांमध्ये अंजनगाव सुर्जी येथील ६५ वर्षीय पुरुष, चांदूर रेल्वेच्या निंभा येथील ६० वर्षीय महिला, नांदगाव पेठ येथील ५० वर्षीय महिला, रामनगर येथील ८० वर्षीय पुरुष, अचलपूर येथील ५७ वर्षीय पुरुष, ब्राम्हणवाडा शिरखेड येथील ६० वर्षीय महिला, मोर्शी येथील ६० वर्षीय पुरुष, चोर माहुली येथील ५० वर्षीय महिला, वरूड पवनी येथील ५५ वर्षीय महिला, अचलपूर काकडा येथील ४५ वर्षीय महिला यांचा समावेश आहे. शुक्रवारी १६१३ रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. ७४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गृहविलगीकरणात महापालिका क्षेत्रात १०९२, ग्रामीण भागात ३५८६ रुग्ण आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण ६२९१, रिकव्हरी दर ९१.५२ टक्के एवढा आहे. मृत्युदर १.५७ टक्के असून, दुपटीचा कालावधी ५४ दिवस एवढा आहे. आतापर्यंत ५ लाख ५० हजार ७४६ नमुने चाचणी करण्यात आले आहे