खबरदारीबाबत ग्रामस्थ राहिले गाफील, प्रशासकीय नियमांकडे दुर्लक्ष
अमरावती; जिल्ह्यात पहिला लाटेमध्ये कोरोनामुक्त असलेल्या ४०० गावांमध्ये दुसऱ्या लाटेत मात्र कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे या गावकऱ्यांची नेमके चुकले काय याचा शोध घेऊन गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी पुन्हा निकराने प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.
गत वर्षी मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. या काळात शहरीभाग कोरोना रुग्णांमुळे त्रस्त असताना ग्रामीण भागातील नागरिकांनी मात्र कोरोनाचे नियमांचे काटेकोर पालन केल्याने सुरुवातीला ८३९ ग्रामपंचायती क्षेत्रातील ९९८ गावांनी कोरोनाला गावापासून दूर ठेवण्यात यश मिळविले होते. बाहेरगावाहून आलेल्या प्रत्येक ग्रामस्थांना १४ दिवसांसाठी क्वारंटाईन राहणे बंधनकारक करण्यात आले होते. ग्रामस्थांची कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला गावात प्रवेश देण्यात आला. या नियमांचे पालन कालांतराने झालेले नाही. त्यामुळे अनेक गावात आजही कोरोनाने वेढले आहेत. गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून ते जानेवारी महिन्यापर्यंत जिल्ह्यात ९९८ गावांनी कोरोनाला आपल्या गावात दूर ठेवण्यात यश मिळविले. परंतु फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या तीन महिन्यांमध्ये कोरोनाच्या प्रतिबंधक नियमांचे पालन न केल्याने ८३९ पैकी ४०० ग्रामपंचायती क्षेत्रातील गावांमध्ये दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला. त्यामुळे ज्या गावात कोरोनाने शिरकाव केला तेथील गाव कारभाऱ्यांनी आता पहिल्यासारखी कडक बंद नियम पाळण्याची गरज आहे.
आमचे काय चुकले?
कोट
मागच्या पूर्ण लाटेत गाव पातळीवर अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तसेच ग्रामस्थांमध्ये भीती होती. त्यामुळे प्रादुर्भाव वाढला नाही. दुसऱ्यासाठी निष्काळजीपणा वाढला. त्यामुळे यावर नियंत्रण मिळविण्यासाठी दक्षता पाळणे आवश्यक आहे.
विपिन अनोकार
सरपंच निमखेड बाजार
कोट
पहिल्या लाटेच्या वेळी ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच कडक निर्बंधामुळे चांगले परिणाम दिसले. परंतु यावेळेस बाहेरून आलेल्या ग्रामस्थांमुळे शिरकाव झाला आहे. नागरिकांनी कोरोना रोखण्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे.
सुवर्णा बरडे सरपंच हिरापूर
कोट
कोरोनाच्या पहिल्या लाटेत गावात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यात बऱ्यापैकी यश आले होते. मात्र त्यानंतर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. परिणामी गावातही रुग्ण नोंद होत आहे.
कविता डांगे सरपंच नांदगाव पेठ
बॉक्स
दुसऱ्या लाटेत या गावात पोहोचला कोरोना
पहिल्या लाटेच कोरोनामुक्त असलेल्या अनेक गावात यावेळेस कोरोनाचा शिरकाव झाला. यात सावलीखेडा, हरिसाल, बिबामल, कुसुमकोट, झिल्पी, राणीगाव, बेरदा बरर्डा, चाकर्दा, दिया, चुणी, डोमा, काटकुंभ, खंडूखेडा, चिखली, सेमाडोह, हतरू, आरेगाव, गौरखेड, सावळी दातुरा, हतनतखेडा, मोखड, गौरखेडा, टेब्रुखेडा, वाठोडा, पुसला, लोणी, आमनेर, सुरळी,अमडापूर, ढगा, वनी सातरगाव, वाढोणा, सुरवाडी, चिंचोंना, चौसाळा, विहिगांव, हिरापूर निमखेड बाजार, लखाड, अडगाव खाडे भंडारज कारला कापुसतळणी कसबेगव्हाण चिंचोली धनेगाव कासंपुरचंडीकापूर, ब्राम्हणवाडा, चिखलसावंगी, खानापूर, पिपळखुटा, प्रल्हादपूर, आष्टगांव, दहसुरी, पार्डी, मायवाडी, दापोरी, डोंगर यावली, खोपडा, तरोडा, दाभेरी, हिरपूर, चिंचोली,सोनगाव खर्डा,आजनगाव,कळाशी,देवगाव,अंजनवाडी,मुंडगाव, बागापूर,कळमजापूर,प्रिपी यादगिरे,यावली शहीद, बोरगाव धर्माळे अशा विविध गावाचा समावेश आहे. या सर्व गावकऱ्यांना आता कोरोनामुक्त होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
बॉक्स
जिल्ह्यातील एकूण गावे -१६८६
सध्या कोरोना रुग्ण असलेली गावे ४००
कोरोनामुक्त गावे ४३९