अमरावती : जिल्ह्यात चार महिन्यापासून असणारी कोरोना सदृश स्थिती, यामुळे सतत घरात राहावे लागत असल्याने नागरिकांचे मोबाईलवेड वाढले आहे. त्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.
निरोगी आयुष्यासाठी झोप महत्त्वाची आहे. नाहीतर त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. निद्रानाश, चिंता तणाव, विनाकारणची चिडचीड यासह अन्य समस्या उद्भवतात. तसे पाहता प्रत्येकाला झोप ही एकप्रकारची प्राथमिक गरजच आहे. झोप आणि मेंदू परस्स्पराशी निगडीत आहेत. त्यामुळे झोप चांगली झाल्यास दिवसभर ताजेतवाने वाटते, याउलट झोप न झाल्यास चिडचीड वाढते. बदलत्या जीवनशैलीत झोप कमी होत असल्याने अनेकांना विकार जडावत आहेत.
एकवेळ निद्रानाश आजार जडावला की पाठोपाठ आजारांचे सत्र सुरू होतात. त्यामुळे प्रत्येक वयोगटातील नागरिकांनी पुरेसी झोप घेणे महत्त्वाचे आहे. प्रसंगी कधी तणावाचे प्रसंग येतात. मात्र, या काळात सकारात्मक राहून पुरेसी झोप घ्यावी. अलीकडे तरुणाई मोबाईलवेडी झालेली आहे. याशिवाय कोरोना संसर्गामुळे सर्व क्लाॅसेसदेखील ऑनलाईन आहे. त्यामुळे याकाळात अभ्यासासोबत पुरेशी झोपही महत्त्वाची असल्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला.
बॉक्स
कमी झोपेचे दुष्परिणाम
* झोप कमी झाल्यास चिडचीड वाढते
* दिनचर्या बिघडते, ॲसीडिटी वाढते
* मानसिक व शारीरिक थकवा जाणवतो
* बीपी, शुगरसारखे आजार जडतात
बॉक्स
झोप का उडते?
* चिंता, तणाव, जीवनशैलीतील बदल आदी कारणांनी निद्रानाश आजार जडतात.
* सतत मोबाईलवर राहिल्याने निद्रानाश होतो व त्यामुळे पुन्हा मोबाईल हाती घेतला जातो.
* मोबाईल किंवा टीव्ही स्क्रिनला सतत खिळून बसल्याने निद्रानाश आजार बळावतो.
* चिंता, उदासिनता, व्यसनाधिनता, आजारपण जवळच्या व्यक्तीचा मृत्यूमुळे झोप उडते.
बॉक्स
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेची गोळी नको
* झोप न लागल्याने त्याचे वाईट परिणाम शरिरावर होतात. त्यामुळे नागरिक स्वत:हून झोपेच्या गोळ्या घेतात. अशा गोळ्या आरोग्यासाठी चिंताजनक आहेत.
* या गोळ्यांचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. मनाची निर्णयक्षमता कमी होते व त्याचा शरीरावर परिणाम होतो.
-----
*झोपण्यापूर्वी आवडीचे संगीत व गाने ऐकावे
* नियमित व्यायाम करावा व सकस आहार घ्यावा
* ताणतणाव नसावा, यासाठी एखादा छंद जोपासावा
* झोपण्यापूर्वी मोबाईल दूर ठेवून वाचन करावे
पाईंटर
नेमकी झोप किती हवी
नवजात बाळ :
एक ते पाच वर्ष : १२ ते १५ तास
शाळेत जाणारी मुले : १० ते १२ तास
२१ ते ४० वर्षे : ०८ ते १० तास
४१ ते ६० वर्ष : ०७ ते ०८ तास
६१ पेक्षा जास्त : ०६ ते ०८ तास
कोट
कोरोना काळात मोबाईलवेड वाढले व वाचन कमी झाले. यासह अनेक कारणांमुळे निद्रानाश जडावतो. पुरेसी झोप न झाल्यास चिडचीड होते व इतरही व्याधी जडावतात व पचनक्रियेवरही परिणाम होतो.
- डॉ मंगेश काळे,