बॉक्स:
काय आहे म्युकरमायकॉसीस आजार?
हे एक दुर्मिळ व घातक फंगल इन्फेक्शन आहे. या आधी मधुमेहाचे रुग्ण, किमोथेरपीचे रुग्ण व प्रत्यारोपणाच्या रुग्णांमध्ये हा आजार खूप कमी प्रमाणात आढळतो. दोन महिन्यांत अमरावतीत मधुमेह असलेल्या व कोविड झालेल्या रुग्णांमध्ये हा आजार दिसून येत आहे.
बॉक्स
ही आहे लक्षणे
रुग्णांना डोकेदुखीचा त्रास, डोळे दुखणे, डोळे लाल होणे किंवा दृष्टी जाणे, पॅरालिसीस ही म्युकरमायकॉसीस आजाराची लक्षणे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
बॉक्स:
इन्फेक्शन तोंडावाटे व नाकावाटे
म्युकरमायकॉसीस हे फंगल इन्फेक्शन नाकावाटे व तोंडावाटे आत जाते केंव्हा - केंव्हा ते सायनसमधून आत शिरते, तर केंव्हा डोळ्यांमधून आत शिरून मेंदूपर्यंत जाते. फंगल हा रक्तवाहिन्यांच्या आत शिरून रक्तवाहिनीला ब्लॉक करतो व तेथील पेशींचा नाश करतो. याच कारणाने डोळ्यांची दृष्टी जाण्यापासून तर पॅरालिसिस होण्यापर्यंतच्या बाबी समोर येत आहेत. सध्या दिवसागणिक चार ते पाच रुग्ण म्युकरमायकॉसीसचे पाहण्यात येत आहेत.
बॉक्स
चार ते पाच आठवडे घ्यावा लागतो उपचार
म्युकरमायकॉसीसच्या रुग्णांना उपचार देतांना एक टीम काम करते ज्यात मॅक्सीलोफेसीयल सर्जन, इएनटी इंटेन्सीव केअर युनीट आणि न्युरोलॉजीस्ट यांची गरज असते. म्युकरमायकॉसीसच्या उपचारात मुख्यत्वे चार ते पाच आठवडे द्यावे लागतात.
बॉक्स:
मधुमेह रुग्णांनी ही घ्यावी काळजी
म्युकरमायकॉसीसच्या पेशंटला शारीरिक व्याधीबरोबर आर्थिक ताणाला सामोरे जावे लागत आहे. कारण कोविड -१९च्या उपचारात आधीच आर्थिक बाजू ढासळलेली असताना नंतर म्युकरमायकॉसीसची चार ते पाच आठवड्यांची ट्रीटमेंट घ्यावी लागते. या सर्व बाजूंचा विचार करता कोविडग्रस्त व मधुमेहाच्या रुग्णांनी जागरूक राहणे खूप महत्त्वाचे आहे. मधुमेह असलेल्या रुग्णांनी आपल्या शुगर लेवलला नियंत्रणात ठेवणे खूप गरजेचे आहे खास करून ते पेशंट की जे घरी उपचार घेत आहेत. हॉस्पिटलमध्ये वेळच्या वेळी शुगर मॉनिटरिंग केले जाते. पण घरी असलेल्या रुग्णांनी आपल्या चाचण्या करीत शुगर नियंत्रित करणे गरजेचे आहे आणि प्रत्येक डायबेटिक पेशंटने लसीकरण करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ओरल हायजीन मेंटेन करणे आवश्यक आहे. कोविडचा उपचार घेताना पेशंट जेव्हा आय.सी.यू.मध्ये असतो तेव्हा पेशंटचा ओरल फ्लोरा मेन्टेन राहत नाही. त्यामुळे फंगल इन्फेक्शनचा शिरकाव होऊ शकतो त्यामुळे ओरल फ्लोरा मेन्टेन ठेवणे गरजेचे आहे. म्युकरमायकॉसीसच्या रुग्णांपैकी ३० ते ४० टक्के रुग्ण आपले प्राण गमावतात. त्यामुळे वेळेत व योग्य उपचार होणे फार गरजेचे आहे.
कोट
कोरोनासोबतच आता म्युकरमायकॉसीस या जीवघेण्या आजाराचे नवे संकट आहे. गत महिनाभरात या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्णांनी सर्तक राहून तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
- सिकंदर अडवाणी,
यूरोलॉजिस्ट, अमरावती