अमरावती : कोरोना संसर्गात कमी येत नाही तोच डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढले आहे. पावसाळ्यात स्थानिक स्वराज्य संस्थाद्वारा पुरेशी काळजी घेतली जात नाही. याशिवाय अनेकांच्या घरातील कूलरमध्ये पाणी साचल्याने डेंग्यूच्या अळ्यांची निर्मिती होत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
कोरोना आणि डेंग्यूची बहुतांश लक्षणे सारखीच असल्याने नागरिकांमध्ये कोरोनाचा संसर्ग तर नव्हे ही शंका येत आहे. त्यामुळे तातडीने चाचणी करून घेणे महत्त्वाचे आहे. या आजारात, सर्दी, ताप, खोकला, अंगदुखीचा त्रास सुरुवातीला होतो. त्यामुळे चाचणी कशाची करायची डेंग्यूची की, कोरोनाची हा संभ्रम नागरिकांमध्ये आहे. या दोन्ही आजारांमध्ये फरक असल्याने अंगावर लक्षणे न काढता तातडीने चाचणी करणे महत्त्वाचे असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
कोट
सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी आदी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांना दाखवावे व आवश्यक ती चाचणी करावी व उपचारही घ्यावा. अंगावर कोणतेही दुखणे काढणे कालांतराने घातक ठरू शकते.
- डॉ श्यामसुंदर निकम,
जिल्हा शल्यचिकित्सक
-----------------
चाचणी कुठली
कोरोनासाठी : आरटीपीसीआर, रॅपिड अँटिजेन
डेंग्यूसाठी : एनएस-१, आयजीजीएम
----------------
बॉक्स
पाणी उकळून प्या, डासांपासून राहा सावध
* पावसाळ्याच्या दिवसात घरालगत पाण्याचे डबके साचणार नाही, याची काळजी घ्या
* कुठलीही निरुपयोगी वस्ती घराबाहेर पडून असेल तर त्यामध्ये पाणी साचणार नाही याकडे लक्ष द्या.
* एक दिवस कोरडा पाळा, पावसाळ्यात उकळते पाणी प्या, डासांचा उत्पत्ती रोखा.
डासांपासून बचावासाठी मच्छरदानीचा वापर करा. लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
बॉक्स
खोकला, ताप, सर्दी, अंगदुखी, कणकण
* डेंग्यू आणी कोरोनाची साधारणपणे लक्षणे सारखीच आहे. यामध्ये सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, कणकण सुरुवातीला वाटते.
* कोरोनामध्ये बरेचदा श्वासोच्छवासाचा त्रास होतो. सर्दी, ताप खोकल्याची तीव्रताही थोडी जास्त असते.
* डेंग्यूमध्ये याशिवाय मळमळ वाटणे, उलट्या होणे अंगातील ताप वाढून थंडी वाजणे आदी लक्षणे दिसून येतात.
पाईंटर
डेंग्यूचे रुग्ण
२०१९ : ३६
२०२० : ३२
२०२१ : ४०