संजय वासुदेवराव सावळापूरकर (रा. खंडेलवालनगर) हे १२ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ भरती करण्यात आले. दरम्यान प्रकृतीत सुधारणा न झाल्याने आयसीयी कक्षात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांच्याजवळी बॅग व त्यातील ऑफिसचे कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, पॉवर बँक, ६०० रुपये नगदी, पेनड्राईव्ह, कपडे होते. त्यांना वॉर्ड बॉय दुसऱ्या कक्षात नेण्यास आला तेव्हा सोबतचे साहित्य मी घेऊन येतो. तुम्ही चेअरवर बसा, असे सांगितले. त्यांना घेऊन गेले. मात्र बॅग त्यांच्याकडे आणून न दिल्याने त्यांनी विचारणा केली. त्यांची बॅग शेवटपर्यंत मिळू शकली नाही. अखेर त्यांना न्याय मिळण्यासाठी रुग्णाच्या मुलाने गाडगेनगर पोलिसांत धाव घेतली. सदर प्रकरण चौकशीत ठेवले आहे.
कोरोना रुग्णाची बॅग पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 4:12 AM