कोरोनामुळे बऱ्याच लोकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. मुंबई-पुण्यासह बड्या शहरांमध्ये नोकरीसाठी गेलेल्या नोकरदारांना कोरोनाच्या भीतीने गावाकडे परत यावे लागले. अनेकांचे उद्योगधंदे बंद पडले आहेत. गेल्या दीड वर्षांत लोक घरीच बसून आहेत. कसाबसा छोटासा व्यवसाय करून कुटुंबाचा आर्थिक गाडा ओढला जात आहे. त्याला गृहिणींनी नेहमीप्रमाणेच साथ देण्याचे काम या संकटकाळात केल्याचे चित्र आहे.
कॉस्ट कटिंगवर महिलांचा अधिक भर आहे. मुलाबाळांच्या कटिंग घरीच केली जात आहे. हॉटेलिंग टाळणे, नवीन कपडे न घेणे, विजेची बचत, इस्त्री घरीच करणे अशा माध्यमातून महिलांनी खर्च कपातीकडे लक्ष दिले. कोरोनाने कॉस्ट कटिंग शिकविल्याच्या प्रतिक्रिया महिला वर्र्गाने दिल्या आहेत.
-----------------------------
कुठे कुठे केली कॉस्ट कटिंग?
१) वीज बिलात बचत करण्यात आली.
2) नवीन कपडे घेणे टाळले.
3) मुलांच्या कटिंग घरीच केल्या.
4) हॉटेलिंग कमी केले.
5) इस्त्री घरीच केली.
6) आहे त्याच चपला वापरण्यात आल्या.
7) प्रवास टाळण्यात आला.
-----------------------
बॉक्स:
अ) कोरोनाकाळात घरोघरी केवळ अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यात आल्या. बाहेरच्या खाण्यावर भर न देता कमी खर्चात घरीच पदार्थ बनवून खाण्याकडे कल आहे.
ब) यादरम्यान विजेची बचत करून वीज बिलामधून आर्थिक फायदा कसा करता येईल, याकडे अधिक भर देण्यात आला. टीव्ही पाहण्याचे प्रमाण वाढले, मात्र आवश्यक तेवढेच बल्ब वापरून त्याची कसर भरून काढण्यात आली.
क) कोरोनाच्या आधी मुलाबाळांचे, पुरुषांचे कपडे, साड्या इस्त्रीसाठी दुकानांमध्ये जात होत्या. आता मात्र घरातील महिला स्वतः कपड्यांची इस्त्री करीत आहेत. त्यातूनदेखील बचतीवर भर दिला जात आहे.
-----------------------------
* गृहिणींच्या प्रतिक्रिया*
1) मुलांच्या कटिंग घरीच करून बचत केली
माझ्या पतीचा चणा, मोट विक्रीचा व्यवसाय आहे. त्यातून तुटपुंजी मिळकत आहे. अशातच कोरोनाच्या संकटाने कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. घरखर्चात कपात होण्यासाठी मी मुलांच्या कटिंग घरीच केल्या.
- गृहिणी
-----------
2) हॉटेलिंग टाळून बचत करतो
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात हॉटेल बंद होती. मात्र, जेव्हा सुरू झाले, त्यानंतर बाहेर जाऊन खाण्याचा मोह टाळला. त्याबदल्यात घरीच पदार्थ बनवून खर्चाची बचत केली व खाण्याचादेखील आस्वाद घेतला.
- गृहिणी
3) वायफळ खर्च टाळण्यावर भर
कोरोनामुळे लग्न समारंभासह इतरही कार्यक्रम जेमतेम लोकांच्या उपस्थितीत होत असल्याने अशा कार्यक्रमांना जाणे कमी झाले आहे. नवीन कपडे विकत घेणे टाळले जात आहे. त्यापासूनदेखील बचत केली जात आहे.
- गृहिणी
-------------------------