धामणगाव रेल्वे : संपूर्ण गाव कोरोनामुक्त व्हावे, यासाठी तालुक्यातील वाढोणा येथे एकाच दिवशी १५० ग्रामस्थांची कोरोना तपासणी करण्यात आली. यात सर्वच अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
दोन महिन्यांपूर्वी वाढोणा गावात सर्वाधिक कोरोना रुग्ण होते. ग्रामपंचायतच्यावतीने सॅनिटायझर, स्वच्छता मोहीम तसेच विनामास्क फिरणाऱ्यांना दंड ठोठावण्यात आला. यादरम्यान पुन्हा कोरोना चाचणी घेण्यात आली. १५० ग्रामस्थांनी स्वतःची तपासणी करून घेतली. आगामी दोन दिवस या ठिकाणी हे शिबिर राबविण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अनिता मेश्राम, सरपंच प्रशांत हुडे, पोलीस पाटील रूपेश तितरे, ग्रामसेवक विलास बिरे, मुख्याध्यापिका प्रतिभा मनोहर, माधवी धाकडे, सीमा पाटील, ममता भावेकर, आरोग्य पर्यवेक्षक संतोष वायकुळे, संदीप चुलबुलकर, नेहा मेंढे, रूपेश उडाखे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ वैशाली निंभोरकर, मनोज सरदार, आशा सेविका देवका वाटघरे, अंगणवाडी सेविका सरला लामकासे तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
===Photopath===
050621\img-20210605-wa0009.jpg
===Caption===
वाढोणा