अमरावती : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेत आता १८ वर्षांवरील सर्वांचे १ मे पासून लसीकरण केले जाणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील १३ लाख ५ हजार ४६ युवकांना लस मिळेल. यापूर्वीचे पहिल्या डोजचे ३३.८३ व दोन डोजचे ७.८१ टक्के असे ४१ टक्के टार्गेट जिल्ह्यात पूर्ण झाले. ही टक्केवारी बरीच मोठी राहिली असती, मात्र लसींचा पुरवठा नियमित होत नसल्यामुळे अर्धेअधिक केंद्रे बंद राहण्याची वेळ जिल्ह्यावर ओढवलेली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत २,४२,६८४ व्यक्तींचे लसीकरण झाले. यात १,९८,७६८ व्यक्तींनी पहिला, तर ४५,९०६ व्यक्तींनी दुसरा डोज घेतले. जिल्ह्यात आतापर्यंत २,०७,९८० कोविशिल्ड, तर ५४,९२० कोव्हॅक्सिनचे व्हायल प्राप्त झाले. यामध्ये ५,८७,४८० व्यक्तींचे लसीकरणाचे टार्गेट असताना २,४२,६७४ व्यक्तींचे लसीकरण सद्यस्थितीत झाले आहे. काही डोस वायादेखील गेलेले आहेत.
जिल्ह्यात चार टप्प्यात लसीकरण होत आहेत. त्यानुसार हेल्थ केअर वर्कर २८,५८३, फ्रंट लाईन वर्कर २५,९४७, ४५ वर्षांवरील कॉमार्बिटीज ७१,६७३ व ६० वर्षांवरील १,१६,४७१ व्यक्तींनी लस घेतली. आता १८ ते १९ वयोगटात २८,३३६ व २० ते २९ वयोगटात ४,४८,०९६ तसेच ३० ते ३९ वयोगटात ५,३२,९७० व ४० ते ४५ वयोगटात २,६६,४.८५ या व्यक्तींचे लसीकरण येत्या १ मेपासून जिल्ह्यात सुरू करण्यात येणार असल्याने दिलासा मिळाला आहे.
बॉक्स
लसींच्या साठ्याचा हवा नियमित पुरवठा
* जिल्ह्यात आतापर्यंत २,०७,९८० कोविशिल्ड, तर ५४,९२० कोव्हॅक्सिनचे व्हायल प्राप्त झाले. जिल्ह्यातील १२५ केंद्राद्वारे लसीकरण करण्यात येत आहे.
* तीन दिवसांपूर्वी मिळालेले २० हजार डोज सद्यस्थितीत संपल्याने जिल्ह्यातील बहुतांश केंद्र बंद आहेत. गुरुवारी रात्रीपर्यत काही डोज मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
बॉक्स
लसीकरणात ज्येष्ठच समोर
जिल्ह्यात आतापर्यंत १,१६,४७१ ज्येष्ठ व्यक्तींचे लसीकरण झालेले आहे. त्या तुलनेत अन्य तीन प्रकारात कमी लसीकरण झाले आहे. यामध्ये शहरी भाग आघाडीवर आहे.
बॉक्स
४५ वयोगटात ७१,६७३ व्यक्तींचे लसीकरण
१) या वयोगटात ६८७८९ व्यक्तींनी पहिला डोज घेतला. यामध्ये कोविशिल्ड ५१,०३६ व कोव्हॅक्सिनचा १७,७५३ व्यक्तींनी डोज घेतला.
२) या वयोगटात २,८८४ व्यक्तींनी दुसरा डोज घेतला. यामध्ये कोविशिल्ड २,२३९ व कोव्हॅक्सिनचा ६४५ व्यक्तींनी डोज घेतलेला आहे.
बॉक्स
वयोगटनिहाय व्यक्ती
* १८ ते १९ वयोगटात २८,३३६ व्यक्ती आहेत
* २० ते २९ वयोगटात ४,४८,०९६ व्यक्ती आहेत.
* ३० ते ४४ वयोगटात ७,९९४५५ व्यक्ती आहेत.
* ४५ ते ५९ वयोगटात ६,७०,३२४ व्यक्ती आहेत.
* ६१ ते ६९ वयोगटात २,४७,७१९ व्यक्ती आहेत.
* ७० ते ७९ वयोगटात १,४५,५८६ व्यक्ती आहेत.
* ८० ते ८९ वयोगटात ७४,३९३ व्यक्ती आहेत.
* ९० ते ९९ वयोगटात १६,५५४ व्यक्ती आहेत.
* १०० पेक्षा अधिक वयोगटात २,२६५ व्यक्ती आहेत.
बॉक्स
शहरी भागात वाढणार केंद्रे
शहरी भागात अधिक लाभार्थी असल्याने लसीकरण केंद्रे वाढविण्याची गरज आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १२५ केंद्रे आहेत. यात आणखी ५० केंद्राची भर पडणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
पाईंटर
जिल्ह्याची एकूण लोकसंख्या २८,८८,४४५
१८ ते ४४ वर्षांचे नागरिक १३,०५,०४६
४५ ते ५९ वर्षांचे नागरिक ६,७०,३२४
६० ते १०० वर्षांचे नागरिक ३,५५,४८७