शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

कोरोना विषाणूचा लग्नसराईला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 5:00 AM

मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात सर्वत्र लग्नसराईचा जल्लोष बघायला मिळतो. कोरोनामुळे देशात २१ दिवस लॉकडाऊन असल्यामुळे पूर्वनियोजित लग्न समारंभ आणि साखरपुड्याचे नियोजन विस्कटले आहे. अधिक लोकांना एकत्र जमा होण्यास मज्जाव असल्यामुळे व खरेदीसाठी बाजारपेठ खुली नसल्याने सध्या लग्नसराईला कोरोनामुळे ब्रेक लागला आहे.

ठळक मुद्देनियोजन कोलमडले : लॉकडाऊनमुळे खरेदी बारगळली

लोकमत न्यूज नेटवर्कब्राम्हणवाडा थडी: देशात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन केल्याने खरेदीपासून पत्रिका तयार करणे ती वाटप करण्याचे नियोजन कोलमडले. त्यामुळे अनेक ठिकाणी लग्नसोहळा पुढे ढकलण्यात येत आहेत. जेवणावळीसाठी आचारी मिळत नसल्याने वाढपी नसल्याने लग्न कशी उरकावयाची, असा प्रश्न वधप-वर मंडळींना पडला आहे.मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात सर्वत्र लग्नसराईचा जल्लोष बघायला मिळतो. कोरोनामुळे देशात २१ दिवस लॉकडाऊन असल्यामुळे पूर्वनियोजित लग्न समारंभ आणि साखरपुड्याचे नियोजन विस्कटले आहे. अधिक लोकांना एकत्र जमा होण्यास मज्जाव असल्यामुळे व खरेदीसाठी बाजारपेठ खुली नसल्याने सध्या लग्नसराईला कोरोनामुळे ब्रेक लागला आहे.लहान-लहान गावांतील वधु-वर एकत्र येत लग्नसराईची खरेदी करतात. शहरासह, तालुकास्तरावर अनेक ठिकाणाहून होलसेल साड्यांचा बसता वर- वधुचे कपडे, दागिने, भांडी आदींची एकदम खरेदी करीत असतात. मात्र, शहरासह ग्रामीण भागातही लॉकडाऊन असल्याने तसेच वाहने बंद असल्याने ही खरेदी रखडली आहे. लग्न म्हणजे भरपूर खरेदी नातेवाईकांत जल्लोषाचे वातावरण असते. पण कोरोनाचे संकट सर्व देशभरात पाय पसरू लागले आहे. त्यांमुळे सर्वत्र लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. जीवनाश्यक सोडून इतर सर्व वस्तूंची दुकाने आणि सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश धडकले आहे. ४ पेक्षा अधिक लोकांना एकत्रित जमा येण्यास मज्जाव केल्यामुळे पूर्वनियोजित लग्न समारंभ व साखरपुड्याचे वेळापत्रक विस्कटले आहे. काहींनी हे समारंभ पुढे ढकलले, तर काहीजण मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नसमारंभ उरकू न घेत आहेत. बरेचदा इतर वेळी भरपूर खरेदी आणि नातेवाईकांच्या उपस्थित होणारे हे समारंभ सध्या थंडबस्त्यात आहेत.मुहूर्त बदलूनही ऐनवेळी टळलेसध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासनाने लॉकडाऊनसह संचारबंदी लागू केली आहे. परिणामी ज्या कु टुंबाकडे विवाह व साखरपुडा समारंभाचे आयोजन केले होते. अशा काही मंडळीने सुरूवातीला मार्च व त्यानंतर एप्रिल महिन्यातील विवाह व साखरपुड्याचे मुहूर्त काढले. परंतु, कोरोनामुळे एक नव्हे तर दोनदोन वेळा मुहूर्त रद्द करावा लागला. यशिवाय बाजारपेठ बंद असल्याने विवाह समारंभाची खरेदीही बारगळल्याचे वर-वधू पित्यांकडून सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmarriageलग्न