लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हिटीचे प्रमाण कमी झाल्याने आठवडाभरात कोरोनाचा विळखा काहीसा सैल झाला आहे. सप्टेंबर महिन्यात आरटी-पीसीआरमध्ये हे प्रमाण ४०.६८ टक्के असे होते. सद्यस्थितीत हे प्रमाण आता २५ ते ३० टक्क्यांपर्यंत आल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यात एप्रिलमध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. यामध्ये पॅझिटिव्हचा आलेख चढत्या क्रमाने होता. त्यानंतर संप्टेबर महिन्यात संसर्गाने उच्चांक गाठला. ४६० पर्यंत संक्रमितांची नोंद झाली. या महिनाभरातच रोज ३०० ते ४०० पर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झालेली आहे. त्यानंतर अचानकपणे कोरोनाग्रस्तांचा 'ग्राफ' घसरायला लागला. या आठवडाभरात रोज १०० ते २०० दरम्यान रुग्णांची नोंद होत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत असल्याने आता अनेक तर्क-वितर्क सुरु झालेले आहेत. लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर प्रत्येक ठिकाणी वर्दळ परतली आहे. नागरिकांमध्ये कोरोना संसर्गचे भय कमी झालेले आहेत. अनेक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. मास्क हा हनुवटीला नव्हे तर चेहऱ्याला लावायचा असतो. ही बाब अनेक जण विसरायला लागले आहे. परिणामी पाच दिवसांची विशेष मोहीम राबविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. अशा स्थितीत कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत असल्याबाबत आता प्रश्नचिन्ह उठले आहेत. यामध्ये अलीकडे चाचण्यांची संख्यादेखील कमी झालेली असल्याने रुग्णसंख्या कमी होत असल्याबाबतचा सूर उमटायला लागला आहे. मुळात चाचणीला येणाऱ्या संशयिताांची संख्या कमी झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.सप्टेंबर महिन्यात स्थिती स्फोटकसप्टेंबर महिन्यात सर्वाधिक ५,६१० रुग्णांची नोंद झाल्याने स्थिती स्फोटक बनली होती. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांचा जिल्हादौरा झाला. नंतर मात्र कोरोनाग्रस्तांचा ग्राफ एकदम माघारला. सप्टेंबरमध्ये आरटी-पीसीआरच्या ९,१२२ चाचण्या झाल्यात. यामध्ये ३,७११ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. ही ४०.६८ टक्केवारी होती. रॅपिड अॅन्टिजनमध्ये ११,४२१ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये १८९९ पॉझिटिव्हची नोंद झाली. ही टक्केवारी ६.६३ आहे. अशी एकू ण २०,५४३ चाचण्या महिनाभरात करण्यात आल्या. त्यापैकी ५६१० अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहे. ही टक्केवारी २७.३१ आहे.ऑक्टोबर महिन्यात आरटी-पीसीआरमध्ये ३३.०३ प्रमाणऑक्टोबरमध्ये सात दिवसांत आरटी-पीसीआरच्या १६९८ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये ५६१ नमुने पॉझिटिव्ह आढळले. हे प्रमाण ३३.०३ टक्के एवढे आहे. म्हणजेच कोरोनाचा संसर्ग अद्यापही कमी झालेला नाही. याउलट प्रोटोकॉलनुसार चाचण्या करण्यात येत असल्यामुळे चाचण्यांची संख्या कमी झालेली आहे. या महिन्यात १ तारखेला ४४८ चाचण्यांमध्ये ११५ पॉझिटिव्ह, २ ला ३५१ चाचण्यांमध्ये ७०, ३ ला ३५८ चाचण्यांमध्ये ७८, ४ ला ३२५ चाचण्यांध्ये १०६, ५ ला २११ चाचण्यांमध्ये १६४ तर ६ ला २०५ चाचण्यांमध्ये ५३ अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहे.
कोरोनाचा विळखा सैल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2020 5:00 AM
जिल्ह्यात एप्रिलमध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. यामध्ये पॅझिटिव्हचा आलेख चढत्या क्रमाने होता. त्यानंतर संप्टेबर महिन्यात संसर्गाने उच्चांक गाठला. ४६० पर्यंत संक्रमितांची नोंद झाली. या महिनाभरातच रोज ३०० ते ४०० पर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झालेली आहे. त्यानंतर अचानकपणे कोरोनाग्रस्तांचा 'ग्राफ' घसरायला लागला. या आठवडाभरात रोज १०० ते २०० दरम्यान रुग्णांची नोंद होत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
ठळक मुद्देपॉझिटिव्ह रुग्ण कमी : सप्टेंबरमध्ये आरटी-पीसीआरचे ४०.६८ टक्के प्रमाण