अमरावती: जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. त्याच प्रमाणे आता शासकीय कार्यालयातही कोरोनाने विळखा घातला असून आरटीओ, पीडब्ल्युडी, व महावितरणच्या अधिकारी,कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये दहशदीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रशासकीय कार्यालयाची माहिती घेतली असता, येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात चार मोटार वाहन निरीक्षक दोन वरीष्ठ लिपीक सात लोकांना कोविड संशयित रूग्ण आढळून आले. त्यांनी कोरोनाची चाचणी केली आहे. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. त्यामुळे आरटीओमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागात येथीलच शाखा एका अभियंता व कंत्राटारांना व ईतर काही कर्मचाऱ्यांना कोरोना ईतर काही कर्मचाऱ्यांना बाधीत निघाले. तसेच महावितरणमध्ये शहर विभागातील एका उपअभिंत्याला कोरोनाची बाधा झाली आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असता शासकीय कार्यालयातही कोरोनाने शिरकाव केल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे कामावर परिणाम निर्माण झाला आहे. कर्तव्यावर असताना आता शंभर टक्के अधिकारी कर्मचारी कार्यालयात हजर राहत असल्यामुळे कोरोनाची बाधा होत आहे. सदर कार्यालयात सॅनिटाईझ करण्यात आले आहे.