अमरावती - बडने-याचे आमदार रवि राणा आणि खासदार नवनीत राणा यांचे थ्रोट स्वॅब सदोष पद्धतीने घेतल्याची धक्कादायक बाब रविवारी निदर्शनास आली. नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) यांनी नमुन्यावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे इर्विन प्रशासनाने रविवारी पुन्हा त्यांचे थ्रोट स्वॅब घेतले असून, आता ते नमुने नागपूर येथे पाठविले जाणार आहे. त्यामुळे येथील आरोग्य प्रशासनाचा कारभार कसा सुरू आहे, हे स्पष्ट होते. आमदार रवि राणा यांना १६ एप्रिलपासून ताप असल्यामुळे ते होम क्वारंटाईन झाले. मात्र, ताप कमी होत नसल्याने शुक्रवारी रात्री त्यांना येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान शनिवारी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी सुपर स्पेशालिटीची चमू पाठवून आमदार, खासदार पती- पत्नीचे थ्रोट स्वॅब घेतले आणि ते नागपूरच्या एम्समध्ये पाठविले. तथापि, एम्सच्या नमुने तपासणी प्रमुख डॉ. मीणा यांनी रविवारी खासदार नवनीत राणा यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून थ्रोट स्वॅब चुकीच्या पद्धतीने घेतल्यामुळे पुन्हा नमुने पाठविण्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर राणा दाम्पत्य आरोग्य विभागाच्या कारभाराबद्दल संप्तत झालेत. कोरोना विषाणूविषयी आरोग्य प्रशासन किती सजग आहे, यासंदर्भात राणा दाम्पत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आमदार, खासदारांना अशी वागणूक मिळत असेल, तर सामान्यांना मरण यातना देणारी आरोग्य यंत्रणा असल्याची संतप्त भावना खासदार नवनीत राणा यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. त्यामुळे कोरोनाबाबत जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीवर कसा विश्वास ठेवावा, असेही त्या म्हणाल्या.मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांकडे करणार तक्रारजिल्हा सामान्य रूग्णालयाचा डोलारा सांभाळणारे प्रमुख असलेले डॉ. श्यामसुंदर निकम यांच्या अफलातून कारभाराची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे करण्यात येईल. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर रूग्णांचे थ्रोट स्वॅब घेण्यासाठी अप्रिशिक्षित चमू आहेत. रविवारी नमुने घेण्यासाठी आलेल्या कर्मचाºयांना हॅन्ड ग्लोव्ज व्यवस्थित नव्हते. त्यांचे हात थरथर कापत होते, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला.जिल्हाधिकारी, सीएसकडून विचारपूसही नाहीआमदार रवि राणा यांना ताप चढल्याने ते खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. कोविड-१९ च्या अनुषंगाने आमदार, खासदार पती-पत्नीचे थ्र्नोट स्वॅब घेण्यात आले आणि ते तपासणीसाठी पाठविले. असे असताना जिल्हाधिकारी शैलेश नवाल किंवा जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी चौकशीदेखील केली नाही, असा आरोप राणा दाम्पत्याने केला आहे.केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडून विचारणा४केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी रविवारी खा. नवनीत राणा यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून आ. रवि राणा यांच्या प्रकृतीची विचारणा केली. केंद्रीय आरोग्यंत्र्यांना वेळ मिळते, पण जिल्हा प्रशासनाला वेळ मिळत नाही, असे खासदार राणा म्हणाल्या.
आमदार, खासदारांचे हे हाल असेल तर सामान्य जनतेचे काय? थ्रोट स्वॅब चुकीच्या पद्धतीने घेतल्याबाबतची माहिती मी सीएस निकम यांना दिली. मात्र, त्यांनी नव्याने नमुने घेण्यासाठी पाठवितो, असे म्हणत बेजाबदारपणावर पांघरूण घातले. - नवनीत राणा, खासदार