शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

‘त्या’ अनियमिततेस महापालिकाच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 11:03 PM

अनधिकृत अभिन्यासावर उभारलेल्या मालमत्ताधारकांना वीज आणि पाणीपुरवठा देण्याच्या मुद्यावर मजीप्रा व महावितरण संशयाच्या भोवऱ्यात असताना त्या अनधिकृततेला आधी महापालिकेचेच भक्कम पाठबळ लाभल्याची बाब उघड झाली आहे.

ठळक मुद्देभ्रष्टाचारास वाव : अनधिकृत अभिन्यासावरील मालमत्तांवर कर आकारणी

आॅनलाईन लोकमतअमरावती : अनधिकृत अभिन्यासावर उभारलेल्या मालमत्ताधारकांना वीज आणि पाणीपुरवठा देण्याच्या मुद्यावर मजीप्रा व महावितरण संशयाच्या भोवऱ्यात असताना त्या अनधिकृततेला आधी महापालिकेचेच भक्कम पाठबळ लाभल्याची बाब उघड झाली आहे. महापालिकेने तेथील ११ मालमत्ता धारकांवर ‘टॅक्स’ आकारणी केल्याने त्यांचा पुढील मार्ग प्रशस्त झाला. त्यामुळे सर्वप्रथम या अनियमिततेस महापालिकेचे संबंधित अधिकारीच जबाबदार आहेत, असा स्पष्ट आरोप करण्यात आला आहे.पांढरी हनुमान मंदिरालगत सर्व्हे क्र. ८ मधील अनधिकृत अभिन्यासावर घरे बांधल्याची तक्रार भाजप नगरसेवक धीरज हिवसे यांनी एप्रिल २०१७ मध्ये केली. याबाबतची तक्रार नगरविकास खात्यासह जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली. आॅक्टोबरमध्ये याच प्रकरणात मुस्तफा नियाजी या जमीन धारकाविरूद्ध फौजदारी तक्रार करण्यात आली. गुन्हाही नोंदविण्यात आला. त्यासाठी महापालिका स्तरावर आयुक्तांनी बैठकाही घेतल्या. सर्व्हे क्र. ८ मधील जमिनीचा ‘एन ए’ न करता मुस्तफा नियाजीने त्या भागात १२५ अधिक भूखंड पाडले व १०० रूपयांच्या मुद्रांकावर त्याची विक्री केली. तेथे ९ घरांचे बांधकाम पूर्ण झाले. पाच घरांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. त्या अभिन्यासाच्या अनधिकृततेवर शिक्कामोर्तब झाले. मात्र त्यानंतरही महापालिकेने तेथील ११ अनधिकृत मालमत्तांना टॅक्स लावण्याचा प्रताप केला. त्यासाठी कायद्याचा आधार घेतला. मात्र जे अभिन्यास व त्यावरील बांधकामाबाबत मंत्रालयापर्यंत तक्रारी करण्यात आल्या, फौजदारी नोंदविली गेली. त्या गंभीर प्रकरणातील मालमत्तांना कर लावण्याची इतकी घाई का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. महापालिका क्षेत्रातील अनेक मालमत्ता कराच्या अखत्यारित नसताना तेथे महापालिकेचे अधिकारी ढुंकुनही पाहत नाही, तर दुसरीकडे गंभीर तक्रार असल्यानंतरही त्या मालमत्तांना कर लावून अधिकृतता बहाल केली जाते. यावरून या प्रकरणातील झारीतील शुक्राचार्यांची ओळख पटण्यासारखी आहे.अनधिकृत अभिन्यासावर बांधण्यात आलेल्या इमारतींना मालमत्ता कर लावला नसता तर पुढील साºयाच बेकायदेशीर बाबी टळल्या असत्या. मात्र, ते टाळण्याऐवजी संबंधित अधिकाºयांनी त्या अनियमिततेला पाठबळच दिले.एनओसीमुळे वीज, पाणीपुरवठारामपुरी कॅम्प झोनने अनधिकृत अभिन्यासावर बांधण्यात आलेल्या ११ घरांवर कर आकारणी केली. त्यांना पावत्या दिल्या. त्या पावत्या दाखवून महापालिकेतूनच ना-हरकत मिळविण्यात आली. त्याचा वापर वीजपुरवठा व पाणीपुरवठा मिळविण्यासाठी करण्यात आला.सर्व्हे क्र. ८ मधील मो. युसुफ, अशरफखाँ मेहमुदखाँ, कादर हुसेन हैदर हुसेन, अ. सलिम शेख युसुफ, राजाखाँ शब्बीरखाँ, अ. वाजीद अ. सलाम, साजिदाबानो हैदरखाँ, फिरोजखाँ रहिम खाँ, रोशन हुसेन शौकत हुसेन, अहमद खाँ मेहराजखाँ व ताहेरउल्लाखॉन मौजदार खाँ यांच्या नव्या मालमत्तांवर कर आकारणी केली.