तक्रारी नुसार अर्जदार मुन्ना ऊर्फ सौरभ सुशील तिवारी हे वरूड नगर परिषदेत प्रहारचे नगरसेवक आहे. बुधवारी दुपारी ३ वाजता दरम्यान ते जनतेच्या समस्या सोडविण्याकरिता पाणीपुरवठा विभागात गेले होते. दरम्यान अतिक्रमण विभागात कर्मचारी गैरअर्जदार दिलीप आमले आणि त्यांचा लहान मुलगा पाणीपुरवठा विभागात जाऊन अर्जदार नगरसेवक तिवारी यांचेशी जुन्या वादातून भांडण केले. ' तू माझ्याविरुद्ध तक्रार करून मला नगर परिषदेतून सस्पेंड केले होते ' असे म्हणून गैर अर्जदाराने खाली ओढून ढकलून दिल्याने अर्जदाराच्या कमरेला झटका पडला. गालावर थापडा बुक्क्यांनी मारहाण केल्याच्याली आणि तक्रार केली तर पाहा, असे म्हणून शिवीगाळ करून धमकी दिली. तिवारी यांचे तक्रारी वरून भादंवि चे कलम ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेण्यात आली . या घटनेची माहिती मिळताच नगर सेवकांनी नगर परिषदेमध्ये धाव घेतली आणि घटनेचा निषेध करून कार्रवाहीची मागणी केली .
* प्रहारच्यावतीने निषेध, कारवाईची मागणी
प्रहारचे नगर सेवक मुन्ना ऊर्फ सौरभ सुशील तिवारी यांना नगर परिषद कर्मचाऱ्याने मारहाण केल्याचा प्रहारऱ्यावतीने निषेध करण्यात आला. सदर गैरअर्जदार कर्मचाऱ्यासह त्याच्या मुलावर कठोर कारवाईची मागणी प्रहारचे तालुका अध्य्क्ष प्रणव कडू यांनी केली आहे.