आॅनलाईन लोकमतअमरावती : जुझर सैफी या कंत्राटदाराने चक्क महापालिकेचीच वीज वापरण्याचा सपाटा चालविला आहे. वर्षभरापासून हा बेकायदेशीर प्रकार सुरू आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. राजकमल ते अंबादेवी मार्गाच्या बांधकामासाठी साहित्य कापण्यासह अन्य कामासाठी ही वीज वापरली जात असून त्याचे बिल मात्र महापालिका अदा करीत आहे. वर्षभरापासून सुरू असलेला हा वीजचोरीचा प्रकार 'लोकमत'च्या वृतानंतर तात्पुरता थांबला आहे.महापालिका आवारात सार्वजनिक शौचालय बांधण्याचा कंत्राट ज्या जुझर सैफीला दिला आहे. तेच राजकमल ते अंबादेवी या ३.५० कोटींच्या रस्त्याचे कंत्राटदार आहेत. स्वच्छतागृहाचे बांधकाम पूर्ण होऊनही त्यात सैफी यांनी रस्त:च्या कामात वापरले जाणारे बांधकाम साहित्य संकलित करून ठेवले होते. मात्र, वीजचोरीचा प्रकार तर त्यावरही कळस लावणारा आहे. वर्षभरापासून सैफी यांनी राजकमल ते अंबादेवी या रस्त्याचे काम हाती घेतले असून त्यासाठी लागणाºया लोखंडी साहित्याची कटाई महापालिका आवारात करण्यात येत आहे. त्यासाठी वीज उपकरणांचा वापर केला जातो. त्यासाठी वीज कोठून वापरायची यावर जुझर सैफी यांनी महापालिकेच्या विजेचा वापर करण्याचे फर्मान सोडले. नव्याने बांधलेल्या शौचालयाच्या भिंतीवर तात्पुरते बोर्ड लावून महापालिकेला जेथून वीजपुरवठा केला जातो, तेथे थेट वायर टाकून वीज वापरली जात आहे. महापालिकेची वीज वापरण्याचा अधिकार कुणी दिला, हे अनुत्तरित आहे.महापालिका करेल का वसुली?वर्षभरापासून ते ठेकेदार बांधकाम साहित्य कापण्यासह अन्य कामांसाठी महापालिकेची वीज बिनदिक्कत वापरत आहे. त्याबाबत त्याने महापालिका प्रशासनाकडून कुठलीही परवानगी घेतलेली नाही. महापालिकेचे अधिकारी पदाधिकाºयांच्या नजरेतून ही बाब सुटलेली नाही. त्यामुळे या ठेकेदाराने वापरलेली महापालिकेच्या विजेची वसुली महापालिका करेल का, हा प्रश्नच आहे.
‘त्या’ ठेकेदाराकडून महापालिकेच्या विजेची चोरी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 10:34 PM
जुझर सैफी या कंत्राटदाराने चक्क महापालिकेचीच वीज वापरण्याचा सपाटा चालविला आहे. वर्षभरापासून हा बेकायदेशीर प्रकार सुरू आहे.
ठळक मुद्देबांधकाम विभागाचाच वरदहस्त : महापालिका आवार बळकावले