फोटो ओळ - चांदूर रेल्वे - आमदार प्रताप अडसड यांना तक्रार देऊन चर्चा करताना अमोल आखरे व इतर
-----------------------------------------------------------------------------------------------
ग्रामपंचायत सदस्याची प्रताप अडसडांकडे तक्रार
चांदूर रेल्वे : तालुक्यातील बासलापूर ग्रामपंचायतमध्ये शौचालय अनुदान वाटपात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप येथील ग्रामपंचायत सदस्य अमोल आखरे यांनी केला आहे. याबाबतची तक्रार आमदार प्रताप अडसड तसेच पंचायत समिती यांच्याकडे केली आहे.
२०१९-२० या कालखंडात बासलापूर ग्रामपंचायत अंतर्गत अनेक लाभार्थींना शौचालय अनुदानाचा लाभ दिला गेला. परंतु, लाभ गरजू लोकांना लाभ न देता ‘आपली माणसे’ ओळखून देण्यात आला. काही कुटुंबात पती-पत्नी अशा दोघांनाही लाभ दिला, तर काहींनी शौचालय बांधले नसतानाही लाभ दिला गेल्याचे नमूद असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात यावी व घरात शौचालय नसलेल्यांना ते बांधण्यास प्रोत्साहन मिळण्यासाठी अनुदानाचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी अमोल आखरे यांनी आमदार प्रताप अडसड यांच्याकडे केली आहे.
(बॉक्समध्ये घेणे)
ग्रामपंचायतीकडून ८-अ बनविण्यास नकार
बासलापूर ग्रामपंचायतीने राजू किसन मोरे यांना ८-अ बनविण्यास नकार दिल्याची तक्रार आ. प्रताप अडसड यांच्याकडे केली असून घरकुलाचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती त्याने केली आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या जागेची पाहणी करून अहवाल सादर केला होता. लाभार्थी हा २०११ पूर्वीचा अतिक्रमणधारक व अन्य कुठेही मालमत्ता धारण केलेली नसल्याचे त्यात नमूद आहे. त्यांचे नाव घरकुल प्रपत्र ‘ब’ यादीत समाविष्ट आहे. मात्र, राहत्या जागेचा नमुना ८ अ लाभार्थीच्या नावाने बनलेला नाही. त्याबाबत ग्रामपंचायतीकडून नकार मिळत असल्याची माहिती त्यांनी आमदारांना दिली.