शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
2
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
3
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
4
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
5
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
6
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
7
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
8
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
9
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
10
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
11
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
12
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
13
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
14
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
15
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
16
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
17
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
18
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
19
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
20
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...

खर्च १७ लाख; उपयोगिता शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 10:16 PM

तब्बल १७ लाख रुपये खर्च करून उभारलेला प्लास्टिक प्रक्रिया प्रकल्प पावणेदोन वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. या प्रकल्पाची उपयोगिता शून्य असताना, पर्यावरण विभाग कुंभकर्णी झोपेत आहे. प्लास्टिकबंदीच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाला ‘फुलफ्लेझ’मध्ये सुरू ठेवण्याची गरज होती. मात्र, अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोर वृत्तीने तो प्रकल्प पांढरा हत्ती ठरला आहे.

ठळक मुद्देप्लास्टिक प्रोसेसिंग युनिट : पर्यावरण विभागावर आयुक्तांची मेहेरनजर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तब्बल १७ लाख रुपये खर्च करून उभारलेला प्लास्टिक प्रक्रिया प्रकल्प पावणेदोन वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. या प्रकल्पाची उपयोगिता शून्य असताना, पर्यावरण विभाग कुंभकर्णी झोपेत आहे. प्लास्टिकबंदीच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाला ‘फुलफ्लेझ’मध्ये सुरू ठेवण्याची गरज होती. मात्र, अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोर वृत्तीने तो प्रकल्प पांढरा हत्ती ठरला आहे.प्लास्टिकबंदी लागू करण्याआधी उच्च न्यायालयाने प्लास्टिकवर प्रक्रिया करणारे केंद्र उभारणीसाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला. अमरावती महापालिकेने २ आॅक्टोबर २०१६ रोजीच सुकळी कंपोस्ट डेपोत प्लास्टिक प्रोसेसिंग युनिट उभारले. पर्यावरण विभागाकडे या प्रकल्पाची जबाबदारी आहे. मात्र, हा प्रकल्प कित्येक महिन्यांपासून बंद असून, तेथे थ्रीफेज वीजपुरवठा नसल्याचे महापालिकेचे रडगाणे आहे. वस्तुत: शहरी फीडरवरून वीजपुरवठा घेऊन हा प्रकल्प अधिक कार्यशीलतेने चालविण्याची गरज होती. मात्र, पर्यावरण विभागाच्या दुर्लक्षाने १७ लाखांचा खर्च व्यर्थ गेला आहे. शहरातून संकलित होणारा प्लास्टिकचा कचरा ‘जैसे थे’ सुकळी कंपोस्ट डेपोत जात असून, हे युनिट बंद असल्याने प्रक्रिया शून्य आहे. गाजावाजा करत ‘रिसायकल युनिट’ उभारले.विखुरलेल्या प्लास्टिकचे आकारमान कमी करून त्याचे गोळे (प्लास्टिक बेल्स) बनवायचे, ते वाहतुकीसाठी सहज सुलभ व्हावे, अशी एकंदरीत या युनिटची कार्यकक्षा होती. मात्र, आधीचे एक वर्ष संबंधित कंत्राटदाराला प्रक्रियेसाठी प्लास्टिकच मिळाले नाही. त्यामुळे त्याने महापालिकेला रॉयल्टी दिली नाही. आता वर्षभरापासून अन्य एक व्यक्ती हे युनिट चालवित असून, तो महापालिकेला रॉयल्टी देत आहे. या प्रकल्पावर पर्यावरण विभागाचे कुठलेच लक्ष नसल्याने तेथे किती क्षमतेच्या प्लास्टिकवर प्रोसेसिंग केली जाते, किती टन प्लास्टिक रिसायकल झाले, याबाबत कुठलाही हिशेब नाही. १७ लाख रुपयांच्या युनिटवर कर्मचाºयांचे वेतन व दुरुस्ती खर्च करून अद्याप २० लाख रूपये खर्च झालेत. मात्र, प्लास्टिक प्रक्रिया गर्भातच गारद झाली आहे.सुकळी कंपोस्ट डेपोत प्लास्टिक रिसायकलिंग युनिटकरिता १४ लाख १८ हजार ७५० रुपये मशीन खरेदी, तर सुमारे १.९९ लाख रुपये टिनशेडसाठी खर्च करण्यात आले. कचरा वेचकाकडून जमा करण्यात आलेले प्लास्टिकचे मोठे चौकोनी ठोकळे तयार करून त्यांनाच परत देण्यात येतात, त्या ठोकळ्यांची विक्री वेचकांकडून करण्यात येते, अशी माहिती पर्यावरण विभागाकडून देण्यात आली.थ्रीफेजसाठी पाठपुरावा नाहीवस्तुत: हे युनिट पर्यावरण विभागाकडून चालविले जाते. मात्र, या विभागाने थ्रीफेज वीजपुरवठ्यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत. ग्रामीण फीडरहून वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. या ठिकाणचे ट्रान्सफार्मर चोरीला गेल्याने तीन महिने वीजपुरवठा बंद होता. त्यामुळे आता कुठे शहरी फीडरवरून वीजपुरवठा मिळविण्यासाठी १७.४६ लाखांचे अंदाजपत्रक बनविण्यात आले आहे. शहरी फीडरहून जोपर्यंत वीजपुरवठा होत नाही, तोपर्यंत या युनिटला वेग प्राप्त होणार नाही.