शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

तक्रारींचा खच, स्वच्छतेची पोलखोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 10:31 PM

कचऱ्याची गाडी महिनोगणती येत नाही; नाल्या केव्हा स्वच्छ करण्यात येतात देवच जाणे; नाल्यांची दुरवस्था, खुल्या भूखंडात पाणी साचल्याने डासांचे आक्रमण; नागरी भागात कमरेएवढे गवत वाढले आहे; साप, विंचू निघताहेत; अस्वच्छतेने डेंग्यूचा कहर माजलाय; कंटेनर पंधरवड्यात उचलला जात नाही; कंटेनरशेजारी कचरा साचल्याने वराहांचा त्रास; अशा नानाविध लोकतक्रारीने शनिवारी महापालिकेच्या स्वच्छता विभागाची पालकमंत्र्यासमोर पुरती शोभा झाली.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचा जनता दरबार : आयुक्त, आरोग्य अधिकाऱ्यांना चपराक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कचऱ्याची गाडी महिनोगणती येत नाही; नाल्या केव्हा स्वच्छ करण्यात येतात देवच जाणे; नाल्यांची दुरवस्था, खुल्या भूखंडात पाणी साचल्याने डासांचे आक्रमण; नागरी भागात कमरेएवढे गवत वाढले आहे; साप, विंचू निघताहेत; अस्वच्छतेने डेंग्यूचा कहर माजलाय; कंटेनर पंधरवड्यात उचलला जात नाही; कंटेनरशेजारी कचरा साचल्याने वराहांचा त्रास; अशा नानाविध लोकतक्रारीने शनिवारी महापालिकेच्या स्वच्छता विभागाची पालकमंत्र्यासमोर पुरती शोभा झाली.पालकमंत्र्यांनी त्या सर्व तक्रारी महापालिका आयुक्तांकडे सुपूर्द करून स्वच्छतेत हयगय खपवून घेतली जाणार नाही, अशा कठोर शब्दांत आयुक्त व आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांना खडे बोल सुनावले. पालकमंत्र्यांनी सर्वप्रथम तक्रारकर्त्यांकडून आलेल्या सर्व लेखी तक्रारी वाचून त्यातील गांभीर्य आयुक्तांच्या लक्षात आणून दिले. कार्यालयीन सहायकांसह आयुक्त व आरोगय अधिकाºयांना त्या तक्रारींची ‘आॅन दि स्पॉट’ नोंद घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिल्याने आयुक्त संजय निपाणे व आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांनी त्या तक्रारींची स्वरुप डायरीत नोंदवून घेतले.डेंग्यूच्या वाढत्या प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी शनिवारी त्यांच्या कॅम्प स्थित जनसंपर्क कार्यालयात अमरावतीकरांच्या समस्या ऐकून घेतल्या. दुपारी १ च्या सुमारास या जनता दरबारास सुरुवात झाली.सर्वाधिक तक्रारी अस्वच्छतेच्याआयुक्त संजय निपाणे, आरोग्य्य अधिकारी सीमा नैताम, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) अजय जाधव, नगरसेवक धीरज हिवसे, अजय सारस्कर, श्रीचंद तेजवानी, राधा कुरील, प्रणय कुळकर्णी, राजेश साहू आदींची उपस्थिती होती. या जनता दरबारात सायंकाळपर्यंत आलेल्या एकूण तक्रारींपैकी ६० टक्के तक्रारी स्वच्छतासंदर्भातील होत्या. प्रत्येक तक्रारकर्त्याची तक्रार पाहून त्यावर उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. नवसारी, गाडगेनगर, गडगडेश्वर, किरणनगर, वडाळी, गजानननगर, एमआयडीसी, छत्री तलाव या भागातील स्वच्छताविषयक समस्या नागरिकांनी पोटतिडकीने मांडल्या. रोज स्वच्छता केली जात नाही; सर्व्हिस लाइन तुडुंब भरल्या आहेत; खुल्या भूखंडावर मोकाट वराहांचा मुक्त वावर असल्याने शहर अस्वच्छतेच्या खाईत लोटले गेल्याचा आरोप बहुतांश तक्रारकर्त्यांनी केला. स्वच्छता विभागाकडे तक्रारी केल्यास त्यांचे कर्मचारीही ढुंकून बघत नाहीत. स्वच्छता कामगार सकाळी १० नंतर शोधूनही सापडत नाहीत, अशा नानाविध तक्रारी करण्यात आल्या.वन्यप्राण्यांचा धुडगूस, पीआर कार्ड, बोगस मदरशांना अनुदान, भूसंपादन, विहीर बुजविणे, विहीर दुरुस्ती, डफरीनमधील अव्यवस्था, जीवनगौरव पुरस्काराची मागणी, शिवटेकडीवरील हरितकरण, रस्ता नसणे, फेरीवाल्यांना प्रतिबंध करण्याची मागणी, शैक्षणिक समस्या, सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी, घनकचरा व्यवस्थापन, घरकुल, पीकविमा, जि.प. बांधकाम विभागाशी संबंधित तक्रार, वेतन, अतिक्रमण, कर्जमाफी, शेतीचे नुकसान, शिफारसपत्र, अनुकंपा नियुक्ती, महाविद्यालयीन शैक्षणिक समस्या, विकासकामे, मोकाट जनावरे, जॉब लेटर, नोकरी, बदली, वाहतूक व्यवस्था, सात-बारा अशा विविधांगी तक्रारी पालकमंत्र्यांच्या लोकदरबारात शनिवारी नोंदविण्यात आल्या. अस्वच्छता दर्शविणारे अनेक छायाचित्रे नागरिकांनी पालकमंत्र्यांना दाखविली. एक नेत्रहीन दाम्पत्याने जनता दरबाराचे लक्ष वेधून घेतले.अशा आल्या तक्रारीछत्री तलावानजीक निर्माल्य. किशोरनगरमधून नालीची तक्रार. समाधाननगर नाल्याशेजारी वाढलेले गवत. जवाहर स्टेडियममध्ये साफसफाई नाही. शिवटेकडीवर फॉगिंग-स्प्रेइंग हवे. प्रशांतनगरमधील नाल्याची सफाई अव्यवस्थित. गडगडेश्वरमध्ये घंटीकटला येत नाही. आदर्श नेहरूनगरातील सार्वजनिक स्वच्छतागृह पाडावे. गाडगेनगरमधील कचरा उचलला जात नाही. पार्वतीनगरमधील नाल्या चोकअप. अर्जुननगरमध्ये कंटेनर नाही. शंकरनगरमधील कंटेनर स्पॉट अस्वच्छ. प्रियदर्शिनी मार्केटमधील व्यावसायिक तिसºया मजल्यावरून कचरा खाली फेकतात. प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी होत नाही. स्वावलंबीनगरातील नाल्या चोकअप. जलारामनगरात साफसफाई नाही, कचरा पडून आदी ५६ तक्रारी पालकमंत्र्यांकडे मांडण्यात आल्या.नगरसेवकांच्या नावानेही ओरडनवसारी भागातील महिलांनी त्यांच्या परिसरातील नाल्या, सर्व्हिस गल्ल्या व रस्ते नसण्याबाबतच्या तक्रारी पालकमंत्र्यांकडे नोंदविल्या. प्रभागात चार नगरसेवक असताना एकही फिरकत नसल्याची तक्रार त्यांनी केली. वडाळी भागातील नागरिकांनीही नगरसेवक फिरकत नसल्याची तक्रार केली, तर गडगडेश्वर भागातील एक नगरसेवक मला विचारून बांधकाम केले का, अशी उलट विचारणा करीत असल्याची गंभीर तक्रार एका नागरिकाने नोंदविली.