शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
2
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
3
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
4
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
5
"पुतिन यांनी युक्रेनला 'टेस्टिंग ग्राउंड' बनवलं", रशियन मिसाइल हल्ल्यावरून झेलेन्स्की भडकले
6
ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन
7
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
8
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा
9
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
10
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
11
पाकिस्तानात 8 वर्षांतील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला; पॅसेंजर वाहनावर ओपन फायरिंग, 39 जणांचा मृत्यू
12
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
13
अदानी ग्रुपचे शेअर्स घरसल्याने LICला मोठा धक्का; तब्बल १२ हजार कोटी रुपये बुडाल्याचा अंदाज
14
न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली...
15
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांसोबत गेले तर...? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
16
३० वर्षांनी मतदानाच्या टक्केवारीत वाढ; सरकार बदलणार की तेच राहणार? इतिहास काय सांगतो
17
Shah Rukh Khan : शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीबाबत खळबळजनक खुलासा
18
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
19
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
20
Kalbhairav Jayanti 2024: कालभैरव जयंतीला 'हे' तोडगे करा आणि संसार तापातून मुक्त व्हा!

शासकीय खरेदीच्या विलंबाने पांढऱ्या सोन्याला कवडीमोल दर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 3:25 PM

Amravati : जिल्हाभरात एकच केंद्र सुरू; खेडा खरेदीत शेतकऱ्यांची लूट

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : प्रत्येक तालुक्यात कापसाची खरेदी करण्यात येणार असल्याचे सीसीआयने जाहीर केले असले तरी जिल्ह्यात मात्र सात दिवसांपूर्वी सात केंद्रे सुरू झाली. १५ दिवसांपूर्वी फक्त एक केंद्र धामणगावला सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे कापसाला हमीभाव तर दूर, खेडा खरेदीमध्ये कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

कपाशी हे जिल्ह्याचे खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाने कपाशीचे नुकसान झाल्याने कापसाचे सरासरी उत्पादन कमी येत आहे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आहेच, शिवाय सततच्या पावसाने कपाशीची बोंडसड झाली आहे. लाल्याने दोन वेच्यात उलंगवाडी होईल, अशी स्थिती आहे. वेचणीसाठी मजूर मिळत नाहीत, निवडणुकीमुळे कामगारांचा तुटवडा आहे. वेचणीचा दर किलोमागे १० रुपयांवर गेला आहे. त्यातुलनेत कापसाला सात हजारांपर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही शेतकऱ्यांच्या पदरी पडणार की नाही, अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत.

भारतीय कापूस महामंडळाद्वारा ५ नोव्हेंबरला धामणगाव रेल्वे येथे कापूस खरेदी केंद्र सुरू केले. येथे आतापर्यंत ५०० क्विंटलपर्यंत कापसाची खरेदी करण्यात आली. अन्य तालुक्यात अद्याप केंद्र सुरू झालेली नाहीत. आठ दिवसांपूर्वी दर्यापूर, येवदा, दर्यापूर, भातकुली, वरूड, नांदगाव पेठ, अंजनगाव सुर्जी येथे सीसीआयचे केंद्र सुरू करण्यात आले तर चांदूरबाजार प्रस्तावित असल्याची माहिती आहे. दरम्यान शासन खरेदीला विलंब व विधानसभा निवडणूक प्रचार यासर्व कारणांमूळे आर्थिक अडचणीतील शेतकरी मिळेल त्या भावात कापूर विकत आहे.

१२ क्विंटलची मर्यादा, आर्द्रतेचा निकष 

  • सीसीआय केंद्रांवर कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना पहिली नोंदणी करावी लागते. यासाठी सातबारा, आधार कार्ड महत्त्वाचे आहे व आधारलिंक असलेल्या खात्यामध्येच पेमेंट जमा केले जाते. यावेळी खरेदीसाठी एकरी १२ क्चिटलची मर्यादा आहे.
  • कापसामध्ये किमान ८ ते १२ टक्के आर्द्रता व एफएक्यू दर्जा ही प्रमुख अट आहे. ८ टक्के आर्द्रता असेल, तर ७,५२१ रुपये क्विंटल हा हमीभाव मिळतो. मात्र, आर्द्रता एक टक्क्याने वाढल्यास क्विंटलमागे हमीदराच्या एक टक्का दर कमी होत जातो.

निवडणुकीमुळे वेचणीला मजूर मिळेनात शेतीच्या कामांसाठी पहिलेच मजुरांची कमतरता आहे. अशातच विधानसभा निवडणुकीचे धुमशान सुरू असल्याने कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याचे शिवारातील चित्र आहे. त्यातच कापूस वेचणीचे दर आताच १० रुपये किलोवर पोहोचले आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी कुटुंब शेतात स्वतः राबताना दिसत आहेत. 

टॅग्स :AmravatiअमरावतीcottonकापूसFarmerशेतकरी