अंजनगाव सुर्जी (अमरावती): दिवाळी दरम्यान कापूस सहा हजारांवर विकला गेला. त्यामुळे कापसाचे भाव वाढण्याची चर्चा होती. बहुतांश शेतकऱ्यांची सहा हजारांपेक्षा अधिक दर असताना कापूस विकला नाही. मात्र, आता ५४०० रुपयांपेक्षा कमी दर झाले. दरात घसरण सुरूच असल्याने शेतकरी साठवलेला कापूस विक्री करण्यासाठी धडपडत असून चिंताग्रस्त असल्याचे चित्र आहे.शेतमालाच्या तेजीचा लाभ शेतकºयांपेक्षा व्यापाºयांनाच अधिक होतो. तेजी मंदीचा अंदाज घेऊन शेतमाल विकण्यासाठी बाजारात येत आहे. यावर्षी कापूस आल्यानंतर बाजारात सहा हजार होते. कापूस खरेदी सुरू झाली तेव्हा हळूहळू दर वाढत होते. त्यामुळे अधिक भाव वाढण्याची आशा शेतकºयांना लागली होती. परिणामी बहुतांश शेतकºयांनी कापूस नवीन घरात सांभाळून ठेवला. दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला तरी कापसाच्या दरात वाढ होण्याऐवजी घसरण सुरू झाली आहे. आजघडीला ५४०० ते ५ हजार रुपयांपर्यंत दर घसरले आहेत. परिणामी कापसाची साठवणूक करणारे शेतकरी तोट्यात आहेत. कापसासारखी जोखीम घरात बाळगू नये, यासाठी शेतकरी जसे भाव वाढतील तसे विकण्यास सुरुवात करतात. मात्र, यावर्षी भाववाढीचे संकेत मिळाल्याने सधन शेतकºयांनी शेकडो क्विंटलची थप्पी घरात लावून ठेवली. एकाचवेळी विक्री केल्यास त्याला लाभ होईल, या आशेवर ते थांबले खरे; मात्र अद्याप भावात घसरण सुरूच असल्याने आता शेतकºयांची चिंता वाढली आहे. भाव वाढले नाही तर अधिक वेळ वाट पाहण्याऐवजी मिळेल त्या दरात विकून मोकळे व्हावे म्हणून कापूस घेऊन बाजारात येणाºयांची गर्दी आता वाढली आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादन घटले. उत्पादन घटले तर दर वाढतात, हे समीकरणही यावेळी फोल ठरले व साठा केलेल्या शेतकºयांना तोटा झाला. आता शेतकरी कापूस विकण्याची घाई करीत आहे. त्यांनी सर्व कापूस संपल्यावर दर वाढल्यास त्याचा लाभ व्यापाºयांना होणार आहे.
कापसाच्या दरात घसरण सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 5:34 AM