लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरिपासाठी ७ लाख २८ हजार ११२ हेक्टरमध्ये पेरणीक्षेत्र कृषी विभागाने प्रस्तावित केले आहे. यामध्ये सर्वाधिक २.९५ लाख हेक्टरमध्ये सोयाबीन, तर १.९० लाख हेक्टरमध्ये कपाशी राहण्याची शक्यता आहे. सलग तीन वर्षांपासून सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असले तरी यंदा पेरणीक्षेत्रात बदल नाही. मात्र, बोंड अळीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कपाशीचे यंदा पेरणीक्षेत्र २० ते ३० हजारांनी कमी होऊन तूर व काही प्रमाणात सोयाबीन क्षेत्रात रूपांतरित होण्याची शक्यता आहे.मागील हंगामात अपुऱ्या पावसाने सोयाबीन मूग, उडीद सारखी अल्पावधीची पिके बाद झाली. त्यामुळे शेतकºयांची मदार कपाशीवर असताना आॅक्टोबरच्या सुरुवातीला आलेल्या गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाने कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर यंदाच्या खरिपाची तयारी कृषी विभागाने सुरू केली आहे. याच अनुषंगाने रविवारी पालकमंत्र्यांनी खरीपपूर्व आढावा सभा घेऊन हंगामाची तयारी जाणून घेऊन सूचना केल्यात. कृषी विभागाच्या माहितीनुसार, यंदाच्या हंगामात ७.२८ लाख हेक्टर पेरणीक्षेत्र राहणार आहे. यामध्ये सोयाबीनचे २ लाख ९५ हजार हेक्टर, कपाशीचे १ लाख ९० हजार हेक्टर, तूर पिकाचे १ लाख ३० हजार हेक्टर, मूग ३३ हजार हेक्टर, ज्वारी २८ हजार हेक्टर, उडीद ३० हजार हेक्टर, धान ३५०० हेक्टर व मटकी, कारळ, बाजरी, मका, तीळ, भाजीपाला आदी १८ हजार ६१२ हेक्टर पेरणीक्षेत्र राहण्याची शक्यता आहे.अमरावती तालुक्यात ५७ हजार ७७८ हेक्टर, भातकुली तालुक्यात ५० हजार ३५४, नांदगाव तालुक्यात ६७ हजार ७७०, तिवसा तालुक्यात ४५ हजार ४५०, चांदूर रेल्वे तालुक्यात ४२ हजार ६५०, धामणगाव तालुक्यात ५५ हजार ४५०, मोर्शी तालुक्यात ६२ हजार ८००, वरूड तालुक्यात ४८ हजार ६००, चांदूर बाजार तालुक्यात ६१ हजार, अचलपूर तालुक्यात ४७ हजार ९००, दर्यापूर तालुक्यात ७० हजार ७५०, धारणी तालुक्यात ४६ हजार ८००, तर चिखलदरा तालुक्यात २५ हजार ३०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आलेले आहे.कपाशीच्या क्षेत्रात ३० हजार हेक्टरने कमीगतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात ३० हजार हेक्टरने कपाशीचे क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे, तर सोयाबीनचे क्षेत्र सारखेच राहील. तुरीच्या क्षेत्रात २० हजारांनी वाढ प्रस्तावित आहे. मूग १० ते १२ हजार, तर उडिदाचे क्षेत्र १५ हजारांनी वाढ होण्याची शक्यता आहे. पाऊस समाधानकारक झाल्यास ही स्थिती कायम राहील. पावसाचे आगमन उशिरा झाल्यास मूग, उडिदाचे क्षेत्र सोयाबीनला जाण्याची शक्यता आहे.
कपाशी कमी; तूर, सोयाबीनची क्षेत्रवाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 1:11 AM
यंदाच्या खरिपासाठी ७ लाख २८ हजार ११२ हेक्टरमध्ये पेरणीक्षेत्र कृषी विभागाने प्रस्तावित केले आहे. यामध्ये सर्वाधिक २.९५ लाख हेक्टरमध्ये सोयाबीन, तर १.९० लाख हेक्टरमध्ये कपाशी राहण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देखरिपाची तयारी : यंदा ७.२८ लाख हेक्टरमध्ये पेरणीक्षेत्र प्रस्तावित