अमरावती :
पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीला गुरुवारी सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. या मतदारसंघात राजकीय पक्षाचे चार व अपक्ष एकोणवीस असे एकूण 23 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी विभागातील पाचही जिल्ह्यात 1,02,403 मतदान झाले. येथील नेमानी गोडाऊनमध्ये सकाळी सात वाजता मतमोजणीला सुरुवात झाली यामध्ये स्ट्रॉंग रूममधून मतपेटी आणण्यात आल्या व एका हौदामध्ये सरमिसळ करण्यात आल्या. यानंतर मतपत्रिकांचे गठ्ठे करण्यास सुरुवात झालेली आहे.
प्रत्येकी 25 मतपत्रिकेचा एक गठ्ठा राहणार आहे. याचदरम्यान अवैध व शंकास्पद मतपत्रिका वेगळ्या काढण्यात येतील. एकूण 28 टेबलवर प्रत्येकी 1000 याप्रमाणे मतपत्रिका मोजणीसाठी देण्यात येणार आहे. यावेळेस विजयी मताचा कोठा समजणार आहे. एका राऊंडमध्ये 28 हजार मत मोजली जातील. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये विजयी मतांचा कोटा पूर्ण न केल्यास बाद झालेल्या उमेदवाराच्या मतपत्रिकेवरील दुसऱ्या क्रमांकाची मते मोजण्यात येतील. त्यामुळे प्रत्यक्ष निकाल हाती यायला बराच उशीर होणार आहे. मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी निवडणूक ऑब्झर्वर पंकजकुमार, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे तसेच पाचही जिल्हाधिकारी मतमोजणी केंद्रावर उपस्थित आहेत.