अमरावती : कोरोना विषाणू संसर्गाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर (पीएचसी) कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत नियोजन करण्यात येत आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचा दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील वाढती रुग्णसंख्या आता कमी होत असली तरी कोरोना विषाणू संसर्गाची तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तविला जात असून तिसऱ्या लाटेत बालक आणि युवकांमध्ये संक्रमणाची शक्यता वर्तविली जात आहे. त्या अनुषंगाने कोरोना विषाणू संसर्गाची संभाव्य तिसरीला रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून जिल्हा परिषद प्रशासनामार्फत उपाययोजनांचे नियोजन करण्यात येत आहे. त्यात जिल्ह्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बालकांसाठी स्वतंत्र वार्ड कार्यान्वित करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच आरोग्य यंत्रणा दिले आहेत. या सोबतच जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संसर्गाची संभाव्य तिसरी लाट नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यातील ६० प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी काही केंद्रात कोरोना बाधित रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनात सुरू केले आहे.
कोट
कोरोना संसर्गाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्ह्यातील ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी २० ते ३० पीएचसी स्तरावर कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
- डॉ. दिलीप रणमले,
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद
बॉक्स
तालुकानिहाय पीएचसीची संख्या
वरूड ६,मोर्शी ५,अंजनगाव सुजी ३,दर्यापूर ४,भातकुली ३,नांदगाव खंडेश्र्वर ५,तिवसा ३,अचलपूर ३,चांदूर बाजार ५,चांदूर रेल्वे ३,धामनगाव रेल्वे ४,चिखलदरा ५,धारणी ६ आणि अमरावती ५