अमरावती : कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे. गत तीन दिवसांपासून केंद्रावर लस उपलब्ध नव्हती. मात्र, सोमवारी दुपारी कोविशिल्डचे १९ हजार, तर कोव्हॅक्सिनच्या १,२७० लसी जिल्ह्यासाठी मिळाल्या आहेत. जिल्हा लस भांडार गृहातून लसींचे वितरण करण्यात आले असून, मंगळवारी केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे. मात्र, दोन दिवस पुरेल एवढाच साठा उपलब्ध असल्याची माहिती डीएचओ दिलीप रणमले यांनी दिली.
पुणे येथील आरोग्य संचालक कार्यालयांकडे सातत्याने लसींची मागणी केल्यानंतर तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यातील नागरिकांसाठी लस उपलब्ध झाली आहे. महापालिका, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात लस वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. कोविशिल्ड लस ही ४५ वर्षांवरील व्यक्तींना दिली जाणार आहे. कोव्हॅक्सिन लस हा दुसरा डोस दिला जाणार आहे. १८ ते ४४ वयाेगटातील तरुणांसाठी ८,७०० लसी प्राप्त असून, त्याचे नियोजन अगोदरच झाले आहे.
---------------
सोमवारी असे झाले लसींचे वाटप
अमरावती महापालिका : ५००० (१८०)
जिल्हा आरोग्य :१००० (१२०)
वरूड: १५०० (१४०)
अमरावती तालुका: १००० (७०)
भातकुली: ९०० (७०)
दर्यापूर: १००० (७०)
अंजनगाव सूर्जी: ८०० (७०)
अचलपूर: १५०० (७०)
चांदूर बाजार: १००० (७०)
चांदूर रेल्वे: ८०० (७०)
धामणगाव रेल्वे :१००० (७०)
तिवसा : ९०० (शून्य)
मोर्शी :१००० (७०)
नांदगाव खंडेश्वर :८०० (७०)
धारणी : ४०० (३०)
चिखलदरा :४०० (३०)
------------------------------