दुसऱ्या लाटेच्या काळात लसीकरणासाठी पहाटे चारपासून केंद्रावर रांगा लागायच्या. काही केंद्रांवर पोलीस बंदोबस्तात लसीकरण झाल्याची उदाहरणे आहेत. जिल्ह्यातील नागरिकांचा लसीकरणाकडे असलेला कल पाहता केंद्रांची संख्या व त्यातुलनेत लसींचा पुरवठा होणे महत्वाचे असतांना तसे झालेले नाही. याचा फटका लसीकरण मोहिमेला बसला व सध्या २० ते २२ टक्केच लसीकरण झाले आहे.
कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये लसीकरण सर्वात महत्वाचे आहे. जिल्ह्यात पहिली लाट सप्टेंबरमध्ये आल्यानंतर कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी लसीकरणाचे प्रयत्न सुरु झाले व जिल्ह्यात सर्वात जोखमीचे काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण १६ जानेवारीपासून करण्यात आले. त्यावेळी मोजकेच कर्मचारी असल्याने जिल्ह्यात सात केंद्रावर लसीकरण करण्यात आले व नंतर केंद्राची संख्या वाढविण्यात आली. मात्र, शासनाद्वारा नंतर फ्रंट लाईन वर्कर व अन्य चार टप्प्यातील लसीकरण सुरु झाल्यानंतर मात्र, ही यंत्रणा कोडमडली.
जिल्ह्यात १८ वषार्वरील २२ लाख नागरिक आहेत. यामध्ये शहरात किमान सहा लाख लाभार्ती संख्या गृहीत घरुन केंद्र सुरु करणे व त्यातुलनेत लसींचा पुरवठा होणे महत्वाचे असतांना असे झालेले नाही, तीच गत ग्रामीणमध्ये झाली. एकूणच नियोजनाचे अभावामुळे लसीकरणाचे मोहिम ‘ब्रेक के बाद’ सुरु आहे.
पाईंटर
आतापर्यत लसीकरण : ६,०२,९७१
पहिला डोस : ४,५२,७९१
दुसरा डोज : १,५०,१८०
पाईंटर
प्राप्त लसी
कोविशिल्ड : ४,७३,२३०
कोव्हक्सिन : १,३७,२१०
बॉक्ट
लसीकरणाची जिल्हास्थिती
जिल्ह्यात आतापर्यत ६,०२,९७१ नागरिकांचे लसीकरण झालेले आहेत. यामध्ये फ्रंट लाईन वर्कर ५५,३४८, हेल्थ केअर वर्कर ३५,१९९, १८ ते ४४ वयोगट ५९,९९६, ४५ ते ५९ वयोगट २,१३,०९१ याशिवाय ६० वर्षावरील २,३८,५३९ ज्येष्ठ नागरिकांचे आतापर्यत लसीकरण करण्यात आले. यामध्ये कोविशिल्ड ४,८६,१३० व कोव्हक्सिनची १,१६,८४१ नागरिकांना लस देण्यात आलेली आहे.
बॉक्स
तरुणाईला महिनाभर ब्रेक
केंद्र शासनाने १८ वर्षावरील प्रत्येक नागरिकांना ऑनलाईन नोंदणी शिवाय लस देण्याचे जाहिर केल्याने केंद्रावर गर्दी होईल या शक्यतेने महिनाभर १८ ते २९ या वयोगटात लसीकरण थांबविण्यात आले होते. या दरम्यान ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. मात्र, आता पुन्हा ातरुणाईचे लसीकरण सुरु झाले असता केंद्रांवर लसींचा ठणठणाट आहे.
बॉक्स
सर्व काही पोर्टलचा घोळ
लसीकरणाच्या पोर्टलवर केंद्रांची नोंदणी आहे व या केंद्रांवर जो पर्यत लसीचा स्टॉक निरंक दाखवित नाही, तोपर्यत ते केंद्र सुरु दाखविते व लसीचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. याशिवाय जिल्ह्यास देखील कोणत्या केंद्रांवर कोणती लस शिल्लक आहे. हे माहिती पडत नसल्याने दुसऱ्या दिवशीचे नियोजन ऐनवेळी करण्यात येते.
कोट
जिल्ह्यात कोविशिल्डचा स्टाॅक संपल्याने ग्रामीणमधील २० ते २५ केंद्र बुधवारी सुरु राहतील, पुरवठ्यासंर्दभात अद्याप एसएमएस अप्राप्त आाहे. एक- दोन दिवसांत पुरवठा होईल
डॉ दिलीप रणमले
जिल्हा आरोग्य अधिकारी