शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘जीएसटी’च्या पुनर्रचनेत एक खिडकीला फाटा, करप्रशासनात वाढली गुंतागुंत

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: July 19, 2024 11:36 PM

२५ जिल्ह्यांतील व्यापाऱ्यांत अस्वस्थता : वैयक्तिक सुनावणीकरिता ४०० किमीपर्यंत हेलपाटे

अमरावती : राज्यातील जीएसटी विभागाच्या पुनर्रचनेमुळे कारभार सुटसुटीत होण्याऐवजी गुंतागुंत वाढली. यामुळे व्यापारी व करसल्लागारांच्या अडचणीत भर पडली आहे. किमान २५ जिल्ह्यांतील व्यापाऱ्यांची गैरसोय होत असल्याने शासनाकडे तक्रारींचा ओघ वाढला आहे. वैयक्तिक सुनावणीसाठी व्यापारी व करसल्लागार यांना आता किमान ४०० किमीचे हेलपाटे मारावे लागणार असल्याने त्यांच्यात अस्वस्थता वाढली आहे.

एक खिडकी पद्धतीतून करप्रशासनाचे अधिकाधिक विकेंद्रीकरण शासनाकडून अपेक्षित असताना २४ जुलैपासून होणाऱ्या अंमलबजावणीमध्ये एक खिडकीला फाटा देण्यात आलेला आहे. ऑडिट शाखेचे राज्यभरात केवळ आठच ठिकाणी केंद्रीकरण करण्यात आल्याने करप्रशासन सुलभ होण्याऐवजी गुंतागुंतीचे होणार, अशीच एकूण स्थिती असल्याचे अमरावती चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीचे अध्यक्ष विनोद कलंत्री यांनी सांगितले.

जीएसटी कायदा २०१७ मध्ये लागू झाला तेव्हापासून जिल्हा कार्यालयात ऑडिटचे काम व्हायचे. ते पुनर्रचनेनंतर झोनस्तरावर म्हणजेच मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. त्यामुळे झोन कार्यालये वगळता २५ जिल्ह्यांतील व्यापारी व कर सल्लागार यांची गैरसोय होणार आहे. ऑडिटमधील त्रुटींना उत्तर देण्यासाठी त्यांना किमान ४०० किमी अंतरावरील झोन कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार असल्याचे वास्तव आहे.

विसंगत पद्धतीने जिल्ह्यांची जोडणीफेररचनेत जिल्ह्यांची विसंगतपणे जोडणी करण्यात आलेली आहे. सातारा, नगर, सोलापूरसारख्या एकेका जिल्ह्याकरिता विभाग निर्माण केला, तर धाराशिव जिल्हा सोलापूर जीएसटी विभागास जवळ असताना नांदेडला जोडण्यात आला. शिवाय हिंगोली, परभणी जिल्हे नांदेडला जवळ असताना जालना जिल्ह्यास व यवतमाळ अमरावतीला जवळ असताना चंद्रपूर विभागात जोडण्यात आल्याचा फटका व्यापारी व करसल्लागार यांना बसणार आहे.

कर्मचारी कपातीने महसुलास फटकाप्रत्येक जिल्ह्यातून २५ ते ३० टक्के कर्मचाऱ्यांना झोन कार्यालयात हलविण्यात येणार आहे. कर्मचारी भरती न करता अपर आयुक्त, सहआयुक्त, ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे वाढविण्यात आली. १२०० अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सध्या ९ अपर आयुक्त आहेत. पुनर्रचनेत कर्मचारी तेवढेच मात्र अपर आयुक्तांची पदे १८ करण्यात आलेली आहेत. याचा थेट परिणाम ई- वेबिल तपासणीवर होऊन शासन महसुलास फटका बसणार आहे. 

टॅग्स :GSTजीएसटीAmravatiअमरावती