शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

कडकडीत बंद, हिंसक वळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 11:55 PM

भीमा कोरेगाव येथे सोमवारी घडलेल्या अनुचित घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी बुधवारी विविध आंबेडकरी संघटनांनी पुकारलेला बंद यशस्वी ठरला.

ठळक मुद्दे‘भीमा कोरेगाव’चा आक्रोश : जिल्हा कचेरीवर धडक, इर्विन चौकात ऐक्याचे दर्शन

आॅनलाईन लोकमतअमरावती : भीमा कोरेगाव येथे सोमवारी घडलेल्या अनुचित घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी बुधवारी विविध आंबेडकरी संघटनांनी पुकारलेला बंद यशस्वी ठरला. अमरावती शहराने यानिमित्त अभूतपूर्व कडकडीत बंद अनुभवला. स्थानिक इर्विन चौक, राजकमल चौकात आंबेडकरी समुदाय एकत्रित आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकाºयांना सादर करण्यात आले. यावेळी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात होता. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी ही आघाडी सांभाळली.माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांच्यासह विविध दलित संघटनांनी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध वस्त्यांमधील आंबेडकरी महिला-पुरुष इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ सकाळपासूनच एकत्रित आले. सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास एका समूहाने येथून राजकमल चौकाकडे कूच केली. हातात पंचशील ध्वज घेऊन, ‘एकच साहेब - बाबासाहेब’ अशा बुलंद घोषणा देत मालवीय चौक, जयस्तंभ चौकमार्गे राजकमल चौक गाठला. दरम्यान, यशोदानगर, फ्रेजरपुरा आदी भागांतूनही आंबेडकरी समुदाय राजकमल चौकात दाखल झाला. यावेळी दोन्ही बाजूंनी आलेल्या आंबेडकरी समुदायाने एकत्रित येऊन राजकमल चौकात दिलेल्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडला. तेथून या अनुयायांनी रेल्वे स्थानक, बस स्थानक, मालटेकडी, गर्ल्स हायस्कूलमार्गे जिल्हा कचेरीचा मार्ग धरला. मार्गातील त्यांच्या हालचालींची माहिती वायरलेसवरून पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना मिळत होती. त्यांच्यासह अनेक पोलीस अधिकाºयांच्या फौजफाट्याने यापूर्वीच जिल्हा कचेरी परिसराचा बंदोबस्त चोख केला.जिल्हा कचेरी परिसर निर्मनुष्यदंगा नियंत्रण पथक, विशेष फोर्स, वरुण वाहन येथे तैनात होते. जिल्हा कचेरीवर धडकलेल्या तमाम आंबेडकरी जनतेच्यावतीने राज्यपालांच्या नावे भीमा कोरेगाव येथे झालेल्या घटनेचा निषेध करणारे निवेदन अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांना सादर करण्यात आले. रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई, भारिप-बमसंचे गुणवंत देवपारे, रामेश्वर अभ्यंकर, भंते संघरक्षित, भीम आर्मीचे मनीष साठे, बसपाचे सुदाम बोरकर, हिंमत ढोले, अमोल इंगळे, नगरसेविका शोभा शिंदे, नंदेश अंबाडकर, बंटी रामटेके, संजय खडसे, सुधीर तायडे, चरणदास इंगोले, सुनील घटाळे, रंजना इंगळे, रत्ना भोंगाळे, पंकज मेश्राम, सुनील रामटेके, मनोज वानखडे, रमेश आठवले, माया धांदे, कमल कांबळे, जगदीश गोवर्धन, स्वप्निल उके, पी.एस. खडसे, सुनंदा बनसोड, सुनीता नागदिवे आदींनी निवेदन सादर केले. तीन दिवसांत भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपींना अटक करा, अन्यथा आंबेडकरी अनुयायी पुन्हा रस्त्यावर येतील, असा इशारा जिल्हा प्रशासनाला देण्यात आला. मार्चेकºयांचे निवेदन स्वीकारण्यासाठी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी आदींनी पुढाकार घेतला. जिल्हा कचेरीतून आंदोलक पुन्हा इर्विन चौकात दाखल झाले. भीमा कोरेगावप्रकरणी आरोपींना कठोर शासन व्हावे, अशी मागणी सुरूच होती. इर्विन चौकात बुधवारी सायंकाळपर्यंत आंबेडकरी समुदायाचे जथ्थेच्या जथ्थे एकत्र येत असल्याचे चित्र दिसून आले.