शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

हिमालय ओलांडून क्रौंच पक्षी अमरावतीत दाखल

By admin | Published: January 31, 2015 12:56 AM

यंदाच्या हिवाळ्यात विदेशी पक्ष्यांची रेलचेल जिल्ह्यातील विविध तलावांवर पाहायला मिळाली आहे. नुकताच हिमालय ओलांडून क्रौंच पक्षी...

अमरावती : यंदाच्या हिवाळ्यात विदेशी पक्ष्यांची रेलचेल जिल्ह्यातील विविध तलावांवर पाहायला मिळाली आहे. नुकताच हिमालय ओलांडून क्रौंच पक्षी अमरावती जिल्ह्यातील एका तलावावर आढळला आहे. मात्र तलावावरील प्रदूषित वातावरणामुळे या स्थंलातरित पक्षांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे. पक्षी तज्ज्ञ कृष्णा खान यांनी नुकताच जिल्ह्यातील विविध तलावांवर भ्रंमती करुन पक्षी निरीक्षण केले आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील विविध तलावांवर स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास आढळून आला आहे. त्यातच सायबेरियन, रशियन प्रांतातून हिमालय ओलांडून आलेले क्रौंच पक्षीसुध्दा एका तलावावर आढळून आल्याने पक्षीमित्रांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. मात्र एकीकडे अमरावती जिल्ह्यातील तलावांवर वाढते प्रदूषण स्थंलातरित व स्थानिक पक्ष्यांच्या अधिवासाला धोका निर्माण करीत असल्याचे मत पक्षीप्रेमींचे आहे. जिल्ह्यात वाढते औद्योगिकीकरण, अवैध मासेमारी आणि कीटकनांशकाचा अति वापरामुळे पक्षांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मागिल काही वर्षांच्या तुलनेत यंदा स्थंलातरीत पक्षांंमध्ये मोठी घट दिसून आल्याचे मत पक्षी तज्ज्ञांचे आहे. साधारणात आॅक्टोबर महिन्यात स्थंलातरित पक्षी जिल्ह्यातील तलावांवर येतात व फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत परतीच्या प्रवासाला लागतात. आता स्थंलातरित पक्षांचा परतीचा प्रवास सुरु झाला असून प्रवासावेळीच क्रौंच पक्षी तलावावर आढळून आला आहे, हे विषेश. (प्रतिनिधी)