शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

४.५० अब्ज वर्षांपूर्वी तयार झाली वसुंधरा

By admin | Published: April 22, 2017 12:25 AM

अन्न, वस्त्र व निवारा देणारी पृथ्वी आपले संतुलन ठेवते. २२ एप्रिल हा ‘जागतिक वसुंधरा दिन’ म्हणून साजरा केला जातो

अमरावती : अन्न, वस्त्र व निवारा देणारी पृथ्वी आपले संतुलन ठेवते. २२ एप्रिल हा ‘जागतिक वसुंधरा दिन’ म्हणून साजरा केला जातो. अशी ही वसुंधरा ४.५० अब्ज वर्षांपूर्वी तयार झाली. पृथ्वीचे वयोमान मोजण्याची वैज्ञानिक पद्धती युरेनियम डेटींग आहे. युरेनियम २३८ या किरणोत्सारी मूलद्रव्यांच्या अर्धे आयुष्याच्या काळावरून पृथ्वीचे वय काढले आहे. सूर्यमालेतील तिसऱ्या क्रमांकाच्या या ग्रहावर फक्त जीवसृष्टी आहे. १९७० साली सर्वप्रथम सॅनफ्रॉन्सिस्को (अमेरिका) येथे अर्थ डे साजरा करण्याचे ठरले. तेव्हापासून २२ एप्रिल हा दिवस ‘जागतिक वसुंधरा दिन’ साजरा केला जातो. अमेरिकेचे गेलॉर्ड नेल्सन हे वसुंधरा दिवसाचे जनक होय. अनंत काळापूर्वी भ्रमणादरम्यान ग्रहमालेतील एक ग्रह सूर्यावर आदळून त्यापासून मोठा तप्त गोळा वेगळा झाला. कालांतराने तो थंड झाला व त्यावर जीवसृष्टी निर्माण झाली, असे वैज्ञानिकांचे मत आहे. दरवर्षी पृथ्वीला सुमारे १० लाख भूकंपाचे धक्के बसतात. त्यातील काही सूक्ष्म असतात. सन २००४ मध्ये झालेल्या त्सूनामीमुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग ३ मायक्रोसेकंद कमी झाला. पृथ्वीचा फिरण्याचा वेग हा कमी होत चाललेला आहे. दर १ लाख वर्षांनी पृथ्वी सूर्याकडे १ सेंटीमीटर ओढली जात आहे. दरवर्षाला चंद्र सुद्धा पृथ्वीपासून ३.८ सें. मी. लांब जात आहे. त्यामुळे १०० वर्षांनी दिवस हा २ मिलीसेकंदाने मोठा होईल. ५ खंडसुद्धा हळूहळू सरकत आहे. न्यूयॉर्क शहर दरवर्षाला लंडनपासून २.५ सें. मी. दूर जात आहे. पृथ्वीचे तापमान वाढत चाललेले आहे. पृथ्वीचा समतोल ढासळत चाललेला आहे. हे तापमान असेच जर वाढले तर भविष्यात मनुष्य व इतर जीवसृष्टी नष्ट होईल, पृथ्वीला आणखी एक मोठा धोका म्हणजे भविष्यात "स्वीप्टटटल" या अवाढव्य धूमकेतूची पृथ्वीशी टक्कर होईल, यामुळेसुद्धा पृथ्वीच्या बऱ्याच भागाची हानी होईल. २१ जुलै १९९४ रोजी शुमेकरलेव्ही या धुमकेतूने गुरू ग्रहाला टक्कर दिली होती. या वसुंधरेला वाळवंट होण्यापासून वाचवायचे असेल, तर आतापासूनच पर्यावरण संरक्षण करणे जरूरी आहे. नाही, तर ही वसुंधरा आपल्याला कधीच माफ करणार नाही. या वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरण प्रेमी विद्यार्थ्यांनी पृथ्वीला वाचविण्यासाठी कोणतातरी एक चांगला संकल्प करावा व तो प्रत्यक्षात आचरणात आणावा, असे आवाहन मराठी विज्ञान परिषद, अभ्यासक विजय गिरूळकर व प्रवीण गुल्हाने यांनी केले आहे.