लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : चोरीचा डाव अंगावर उलटू नये म्हणून आरोपीनेच स्वत:च्या अपहरणाचा बनाव केला. आरोपींच्या बयानातील विसंगतीसुद्धा पोलिसांनी हेरली. त्यातून पुढे अपहरणाच्या तक्रारीचा फोलपणा उघड झाला. तपासाअंती तक्रारीच्या दीड महिन्यानंतर खऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. गुरुवारी याप्रकरणी पाच आरोपींना अटक केली. फिर्यादी महिलेचा मुलगाच या संपूर्ण कटाचा सूत्रधार निघाला. यातील चौघांना ठाणे येथून अटक करण्यात आली. वैभव भडांगे हा स्वत:च पोलिसांसमोर हजर झाला.तालुक्यातील निमखेड येथील दोन तरुणांचे अपहरण केल्याची तक्रार १५ एप्रिल रोजी ब्राम्हणवाडा पोलिसांत नोंदविली होती. त्या दोन तरुणांचे अपहरण झालेच नव्हते, तर ते दोघेही चोरीच्या कटात सहभागी असल्याचे तपासात स्पष्ट झाले. निमखेड येथील आशा त्र्यंबक भडांगे यांनी त्यांचा मुलगा वैभव भडांगे व त्याचा मित्र डॉ.संभाजी खुल्लिंगे यांचे १३ एप्रिल रोजी त्यांच्याच वाहनातून अपहरण झाल्याची तक्रार नोंदविली होती. त्यानुसार, गावातील दिलीप भडांगेंकडे आलेल्या तीन अनोळखी इसमांनी वैभव व संभाजी यांचे त्यांच्याच चारचाकी वाहनातून बळजबरीने अपहरण केले. त्यावेळी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास प्रारंभला होता.वैभव भडांगे स्वत:हून हजरआशा भडांगे यांच्या तक्रारीनुसार, तीन अनोळखी इसमांनी त्यांचा मुलगा वैभवचे अपहरण केले. तो वैभव भडांगे काही दिवसांपूर्वी ब्राम्हणवाडा पोलीस ठाण्यात स्वत: हजर झाला. त्याचा जबाब नोंदविल्यानंतर बºयाच गोष्टी संशयास्पद वाटल्याने सायबर पोलिसांची मदत घेतली. वैभव भडांगेसोबत ज्या संभाजी खुल्लिंगेचे अपहरण झाल्याची तक्रार होती, त्या संभाजीबाबत वैभवला काहीही माहिती नसणे पोलिसांना खटकले. दोघांच्या मोबाईलचा सीडीआर काढण्यात आला. त्या आधारे संभाजी खुल्लिंगे यास ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथून अटक करण्यात आली.पोलीस अधीक्षक दिलीप झळके, अपर पोलीस अधीक्षक शाम घुगे, एसडीपीओ पोपटराव आबदागिरे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सचिनसिंग परदेशी, उपनिरीक्षक रवींद्र मस्कर, पोलीस नाईक दिनेश वानखडे, सचिन भुजाडे, नीलेश डांगोरे, महेंद्र राऊत यांनी या गुन्हयाचा उलगडा केला.
बचावासाठी रचला स्वत:च्या अपहरणाचा बनाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 1:00 AM
चोरीचा डाव अंगावर उलटू नये म्हणून आरोपीनेच स्वत:च्या अपहरणाचा बनाव केला. आरोपींच्या बयानातील विसंगतीसुद्धा पोलिसांनी हेरली. त्यातून पुढे अपहरणाच्या तक्रारीचा फोलपणा उघड झाला. तपासाअंती तक्रारीच्या दीड महिन्यानंतर खऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.
ठळक मुद्देफिर्यादीचा मुलगाच आरोपी : दीड महिन्यानंतर उलगडा