शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

बासलापूरच्या जंगलात सुंदर तलावाची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2021 5:00 AM

या तलावाचे जलपूजन लवकरच पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  तलावाच्या कामाबाबत सादरीकरण नुकतेच  पालकमंत्र्यांसमक्ष केले. वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उभारलेल्या या वन तलावामुळे वनांचे पर्यावरण सुधारण्यास मदत होणार आहे. यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तांत्रिक मदत न घेता स्वतः झटून हे काम पूर्ण केले, हे कौतुकास्पद आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चांदूर रेल्वे तालुक्यातील बसलापूर येथील वनक्षेत्रामध्ये वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुठलीही तांत्रिक मदत न घेता स्वयंस्फूर्तीने एका सुंदर तलावाची  निर्मिती केली आहे. या तलावामुळे भूजलपातळीत सुधारणा होऊन वन्यप्राण्यांना जंगलातच पाणी उपलब्ध झाले, ही बाब गौरवशाली असल्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी येथे व्यक्त केले. यावेळी कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे, जि.प.  सभापती जयंत देशमुख, सेवानिवृत्त वनाधिकारी अशोक कविटकर, वनपरीक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार लवकरच जलपूजनया तलावाचे जलपूजन लवकरच पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  तलावाच्या कामाबाबत सादरीकरण नुकतेच  पालकमंत्र्यांसमक्ष केले. वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उभारलेल्या या वन तलावामुळे वनांचे पर्यावरण सुधारण्यास मदत होणार आहे. यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तांत्रिक मदत न घेता स्वतः झटून हे काम पूर्ण केले, हे कौतुकास्पद आहे. जल व वन व्यवस्थापनाचे हे काम सर्वांसाठी आदर्श ठरणारे आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

३२० मीटर लांबीचा तलावहा तलाव वनविभाग कर्मचारी व अधिकारी यांनी स्वतः सर्वेक्षणातून अंदाजपत्रक तयार करून, तसेच अभियंत्यांचीही तांत्रिक मदत न घेता स्वतः बांधला आहे.  तलावाच्या भिंतीची लांबी ३२०  मीटर आहे. तलावात मोठ्या प्रमाणावर जलसाठा असून त्याची खोली २० फूट आहे.

वन्यप्राण्यांचा शेतानजीकचा वावर थांबलाजंगलात पाणी उपलब्ध नसेल तर वन्यप्राणी पाण्याच्या शोधात शेत किंवा गावाजवळील पाणीसाठ्याकडे वळतात. यामुळे शेतीचे नुकसान संभवते. तथापि, जंगलातच मोठा पाणीसाठा उपलब्ध झाल्याने वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय झाली आहे. त्यामुळे या वनातील वन्यप्राण्यांचा जंगलाबाहेरील वावर थांबला आहे. त्याचप्रमाणे, वनानजीकच्या शेती क्षेत्रातही भूजलपातळी सुधारली आहे. वनांचे पर्यावरण, निसर्गाचा समतोल साधला जाण्याबरोबरच भूजल पातळी वाढल्याने नजीकच्या शेतीलाही फायदा झाला आहे, अशी माहिती तत्कालीन सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर यांनी दिली. तलावाचे अंदाजपत्रक व तलाव बांधकाम अशोक कविटकर यांच्या मार्गदर्शनखाली वनक्षेत्रपाल आशिष कोकाटे, वनरक्षक अक्षरे व वनसेवक अजय चौधरी यांनी  केले आहे.

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प