शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पाथरगाव उपसा सिंचन योजनेचे श्रेय अडसड यांनी लाटू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 11:46 PM

चांदूर रेल्वे तालुक्यातील पाथगाव उपसा सिंचन योजना सुरू करण्यासाठी आ. वीरेंद्र जगताप यांनी मागील दहा वर्षांपासून शासन व प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे.

ठळक मुद्देअशोक वाढोणकर, उमेश केणे : आमदार जगताप यांची उपस्थिती

आॅनलाईन लोकमतअमरावती : चांदूर रेल्वे तालुक्यातील पाथगाव उपसा सिंचन योजना सुरू करण्यासाठी आ. वीरेंद्र जगताप यांनी मागील दहा वर्षांपासून शासन व प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. आता याचे श्रेय माजी आमदार अरूण अडसड घेतल्याचा आरोप आमला विश्वेश्वर संघर्ष समितीचे अशोक वाढोणकर व येथील माजी सरपंच उमेश केने यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी केला.अशोक वाढोणकर पुढे म्हणाले, पाथरगाव उपसा सिंचन योजनेतंर्गत येणाºया जळका जगताप, आमला विश्वेश्वर, टेंभुर्णी, सावंगी (मग्रापूर), पाथरगाव व सालोरा (खुर्द) ही गावे कोरडवाहू क्षेत्रात समाविष्ट असून सामाजिक अन्याय विरोधी संघटनेचे अशोक वाढोणकर, भगवान वाघ व त्यांचे सहकारी यांनी पुढाकार घेतला. त्यात फारसे यश न आल्याने वरील मंडळीसह माजी झेडपी सदस्य व तत्कालीन सरपंच उमेश केणे यांनी पाथगाव उपसा सिंचन योजना सुरू करण्यासाठी आ. वीरेंद्र जगताप यांची मदत घेतली.तत्कालीन जलसंपदामंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेला मान्यता प्रदान दिली होती. त्याबाबत पत्रसुद्धा आ. जगताप यांना प्राप्त झाले होते. विशेष म्हणजे २०१० मध्ये अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांनी योजनेला निधी मंजूर करण्याचे आदेश दिले होते. अरुण अडसड यांचा या कामासाठी पाठपुरावा नाही, असा आरोप अशोक वाढोणकर , उमेश केणे यांनी केला. पत्रपरिषदेला आ. वीरेद्र जगताप, झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे, सदस्य सुरेश निमकर, नितीन दगडकर आदी उपस्थित होतेअङसड यांनी ठोस पुरावे दाखवावे; आमदारकी सोडूपाथरगाव उपसा सिंचन योजनेसाठी सलग दहा वर्षे स्वत: पाठपुरावा शासन, प्रशासन व मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री अन्य ठिकाणी लेखीस्वरूपात पत्रव्यवहार केला. माजी आमदार अरुण अडसड यांनी पाठपुरावा केल्याचे पुरावे दाखवावे; आपण आमदारकीचा राजीनामा देऊ असे, आ. जगताप म्हणालेतजगतापाचे प्रयत्नच सिंचनासाठी ठरले वरदानपाथगाव उपसा सिंचन योजना सुरू करण्यासाठी आ. वीरेंद्र जगताप यांनी केलेल्या सलग पाठपुराव्यामुळे वरील योजनेतून २१६३ हेक्टर क्षेत्रांवर सिंचनाची सोय होऊ शकली. ज्यांनी लाभ घेण्याचा प्रयत्न चालविला, त्यांनीच योजनेला सुरूवातीपासून विरोध केल्याचा आरोप वाढोणकर यांनी केला आहे.