चिखलदरा (अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील केलपानी जंगलात आदिवासी आणि पोलिसांदरम्यान झालेल्या धुमश्चक्रीप्रकरणी ११० आदिवासींविरुद्ध गुन्हे दाखल झाले.पुनर्वसित आठ गावांतील आदिवासी गाव सोडून गाभा क्षेत्रातील मूळ गावी केलपानी येथे १५ जानेवारीपासून ठाण मांडून होते. त्यांना समजावण्यास गेलेल्या वनाधिकारी-कर्मचारी, पोलीस, सीआरपीएफच्या जवानांवर काठ्या, कुºहाडी, कुकरी, मिरची पूड, काचकुहिरी टाकून हल्ला केला. यात वनविभागाचे ५० अधिकारी, कर्मचारी, सीआरपीएफ व पोलीस कर्मचारी गंभीर व किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी चिखलदरा पोलिसांनी सहायक पोलीस उपनिरीक्षक दिनेश तायडे यांनी फिर्याद दिली आहे.या प्रकारानंतर काही आदिवासी बेपत्ता असल्याने त्यांचा शोध घेतला जात आहे. जंगलात एसआरपीएफच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.आदिवासींचा आरोपआम्हाला गावातून बेदखल करताना वन विभागाकडून मोठ-मोठी आश्वासने देण्यात आली होती. मात्र आम्हाला देण्यात आलेल्या दहा लाख रुपयांत रस्ते, नाले आदी विकासकामांसाठी खर्च झाला. त्यामुळे शेती व उर्वरित रक्कम देण्याच्या मागणीसाठी आम्ही मूळ गावीच ठाण मांडून बसलेले असताना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी आमच्यावर अचानक लाठीमार केला. वाहनांमध्ये भरण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच संघर्षाला तोंड फुटले आणि पुढील प्रकार घडला, असे येथील आदिवासींचे म्हणणे आहे.>गोळीबार नव्हे, अश्रुधुराच्या नळकांड्याआदिवासींनी अचानक शासकीय अधिकारी कर्मचाºयांवर हमला करताच त्यांना पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्याचे चिखलदराचे ठाणेदार आकाश शिंदे यांनी गुरुवारी पुन्हा स्पष्ट केले.
मेळघाटातील ११० आदिवासींवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 3:33 AM