अमरावती : बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांढरी गावानजीक १५ नोव्हेंबरला झालेल्या अपघातप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भादंविचे कलम २७९,३३७,३०४(अ) अन्वये रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातातील जखमी दुचाकीस्वार युवक २० नोव्हेंबर रोजी दगावला.
पोलीस सूत्रांनुसार, राहुल संतोष देशमुख ( २८ रा. पलाश लेन, गाडगेनगर) असे मृताचे नाव आहे. यासंदर्भात मृताचा लहान भाऊ पवन देशमुख (२५) यांनी बडनेरा ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानुसार, राहुल हा मित्राकडे भोजनाकरिता गेला होता. दुचाकीने भातकुलीकडून अमरावतीकडे येत असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. डोक्याला गंभीर इजा झाल्याने प्रथम अमरावती व त्यानंतर नागपूर येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले. त्याचा २० नोव्हे्ंबर रोजी मृत्यू झाला.