अमरावती : नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ॲकेडमिक हायस्कूलच्या मागे गवळीपुरा येथे सुरू असलेल्या जुगारावर गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली. या कारवाईत १९ जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ३ लाख ४४ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. १० नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली.
अटक आरोपींमध्ये शेख अन्सार शेख सुलतान (४०, रा. तारखेडा), गुलाम अहमद निसार अहमद, संजय प्रताप सारसर, अंकुश रावसाहेब गंधे, विनेश बापुराव पंढसे, शैलेश सुरेशराव घोंगडे, सुनीलसिंग शेरासिंग बावडी, मनीष वसंतराव ढवळे, संजय किसनराव डोळस, अनुप गजानन बिजवे, विलास संतोष वाहाणे, शेख वसीम शेख करिम, कादर खान शाहीद खान, मुजफ्फर खान जफर खान, अफरोज खान मजीद खान, अक्षय मनोज डिक्याव, गजानन आबाराव इंगोले, राहिल व ईलयास अली महेबूब अली या जुगाऱ्यांचा समावेश आहे.
नागपुरी गेट ठाण्यात गुन्हा
जुगाऱ्यांकडून रोख ३ लाख ४४ हजार ८२० रुपये व अन्य साहित्य असा एकूण ३ लाख ४४ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नरेशकुमार मुंढे व राजकिरण येवले, राजूआप्पा बाहेनकर, फिरोज खान, सतीश देशमुख, अजय मिश्रा, प्रशांत वडनेरकर, सय्यद इम्रान, निवृत्ती काकड आदींनी ही कारवाई केली.आरोपीविरुद्ध नागपुरी गेट ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.