शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
3
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
4
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
5
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!
6
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण
7
कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
9
चीनच्या सैन्याची माघार, आता दिवाळीत तोंड गोड करणार; लष्कराने सीमेवरती स्थिती सांगितली
10
KL राहुलनं नाकारली LSG नं दिलेली ऑफर? हे कारण देत सोडलीये संघाची साथ
11
निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...
12
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार
13
भाजपचा विरोध, पण दादांनी..."; नवाब मलिकांनी सांगितलं काय घडलं राजकारण
14
भुजबळांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरेंचा खोचक सल्ला, म्हणाले- "त्यांनी एक पक्ष काढावा आमचा...!"
15
'मैंने प्यार किया'ची सुमन वयाची पन्नाशी उलटली तरी आताही दिसते तितकीच ग्लॅमरस, पाहा फोटो
16
"महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपा आणि महायुतीचा दावा फसवा आणि खोटा’’, नाना पटोले यांची टीका  
17
भाजपाचा प्रचारसभांचा धडाका! PM मोदी ८, अमित शाह २० सभा घेणार; योगी आदित्यनाथांच्या किती?
18
“मनसे सत्तेत येईल, आमच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल”; राज ठाकरेंचे स्पष्ट संकेत
19
रितेश देशमुखचा अमित व धीरज यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा!
20
मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर

टॉर्चरमुळे तिने केले ब्रेकअप, तो म्हणाला का तोडलेस?

By प्रदीप भाकरे | Published: May 29, 2023 4:57 PM

वारंवार पाठलाग : शिविगाळ करून मारण्याची धमकी

अमरावती : इंजिनिअरिंग कॉलेजमधील क्लासमेट असलेल्या प्रेयसीने ब्रेकअप केल्याच्या कारणावरून तिच्या माथेफिरू प्रियकराने तिचा गळा कापला होता. तर त्याने देखील आत्महत्येचा बनाव केला होता. त्या घटनेची शाई वाळते न वाळतेच पुन्हा एकदा एका तरूणाने प्रेयसीचा बेमालूमपणे पाठलाग चालविल्याचा प्रकार बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाला. प्रेमसंबंध तोडल्याच्या कारणावरून पुर्वाश्रमीच्या प्रियकराने आपल्याला धमकावल्याची तक्रार पिडिताने बडनेरा पोलिसांत नोंदविली आहे.

शुभम उत्तमराव सहारे (२७, रा. शिवाजीनगर, बडनेरा) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूध्द २८ मे रोजी दुपारी विनयभंग, शिविगाळ, जीवे मारण्याची धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनुसार, यातील फिर्यादी तरूणीची सन २०१८ मध्ये आरोपीसोबत फेसबुकवर ओळख झाली. त्यानंतर ती आरोपीसोबत फोनवर बोलायची, भेटायची, व्हॉट्सअँपवर चॅटींग करायची. त्यातून त्यांचे प्रेमसंबंध बहरले. काही दिवस सुखनैव चालले. दोघेही सोशल मिडियावर व्यक्त होऊ लागले. मात्र काही दिवसांनी आरोपी शुभम हा फिर्यादी तरूणीवर संशय घेऊ लागला. बाहेर फिरायला जाऊ नकोस, कोणासोबत बाहेर जाऊ नकोस, बाहेर गेलीस तर कुणासोबत गेली होतीस, कुणाशी बोलली तर का बोललीस, असा हुकूम तो तिच्यावर गाजवायला लागला. शिवीगाळ करून धमक्या देखील दिल्याने तरूणीने सहा महिन्यापुर्वी आरोपीसोबत असलेले प्रेमसंबंध संपुष्टात आणले. तुझा माझा संबंध संपला, असे निर्वाणीचे सांगून तिने ब्रेकअप केले.

फोनकॉलवरून धमकी, ती हादरली

आरोपी शुभम हा प्रेमसंबंध तोडल्याच्या कारणामुळे फिर्यादी तरूणीचा पाठलाग करू लागला. तिला कोठेही थांबवून प्रेमसंबंध का तोडले, या कारणावरून शिवीगाळ करून मारण्याच्या धमक्या देऊ लागला. दरम्यान, २६ मे रोजी रात्री ११ च्या सुमारास शुभमने तरूणीला फोन कॉल केला. तथा ब्रेकअपच्या कारणावरून अश्लिल शिवीगाळ केली. त्या प्रकाराने ती नखशिखांत हादरली. त्यामुळे ती शुन्यात हरविली. मात्र आताच जर आरोपीचा बंदोबस्त केला नाही, तर त्याचा त्रास अधिक वाढेल, या विचाराने २८ ला दुपारी तिने पालकांसमवेत बडनेरा पोलीस ठाणे गाठले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगAmravatiअमरावती