शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

क्राईम : रहाटगाव, ट्रान्सपोर्टनगर, नागपुरी गेटमध्ये ‘हाफ मर्डर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2022 5:00 AM

अ. फहीम अ. रऊफ (३०, रा. रोशननगर) व मकबूलशाह हबीबशाह (५१, रा. रोशननगर) हे गंभीर जखमी झाले. अ. फहीम यांचे शेजारी मकबूलशाह याच्याशी १६ मार्च रोजी वाद झाला. त्यावरून १७ मार्चला सायंकाळी ५ ते ६ च्या सुमारास मकबूलशाह व अन्य चार जण शिवीगाळ करीत होते. त्यावर अ. फहीम घराबाहेर येताच मकबूलशाहने  डाव्या हाताच्या दंडावर तलवारीने वार केला, तर आकीब (रा. रहेमतनगर) याने फरशाने वार केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :  रंगपंचमीला अमरावती शहरात रक्तरंजित थरार घडला. तब्बल चार हाफ मर्डरची नोंद शहरातील पोलीस ठाण्यांनी घेतली. रोशननगर येथे आपसी वादातून सशस्त्र मारहाण करण्यात आली. रहाटगाव येथे हॉटेलात तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. ट्रान्स्पोर्टनगरातही एका युवकाच्या पायावर चाकुहल्ला चढविण्यात आला. पोलिसांनी या तिन्ही प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला आहे. 

रोशननगर  नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील रोशननगर येथे तलवार, फरशा व पाईपने परस्परांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. १७ मार्च रोजी ट्रक लावण्याच्या वादातून परस्परविरोधी तक्रारींवरून पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. यात अ. फहीम अ. रऊफ (३०, रा. रोशननगर) व मकबूलशाह हबीबशाह (५१, रा. रोशननगर) हे गंभीर जखमी झाले. अ. फहीम यांचे शेजारी मकबूलशाह याच्याशी १६ मार्च रोजी वाद झाला. त्यावरून १७ मार्चला सायंकाळी ५ ते ६ च्या सुमारास मकबूलशाह व अन्य चार जण शिवीगाळ करीत होते. त्यावर अ. फहीम घराबाहेर येताच मकबूलशाहने  डाव्या हाताच्या दंडावर तलवारीने वार केला, तर आकीब (रा. रहेमतनगर) याने फरशाने वार केला. मोईनशाह मकबूलशाह, फैजान नुरुद्दीन व गुड्डू शाह (रा. रहमतनगर) यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे बयाण अ. फहीम यांनी नोंदविले. याप्रकरणी पाचही आरोपींविरुद्ध कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९ व आर्म्स ॲक्ट कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मकबूलशाह हबीबशाह याच्या तक्रारीवरून अ. फहीम अ. रउफ, अ. सज्जू अ. रऊफ  व अ. दानिश अ. रऊफ (सर्व रा. रोशननगर) यांच्याविरुद्ध कलम ३०७, ३४ गुन्हा नोंदविण्यात आला. समजावण्यासाठी गेला तेव्हा अ. फहीमने मकबूलशाहच्या डोक्यावर फरशा मारला, तर अ. सज्जूने त्याच्या गळ्यावर तलवारीने वार केला. यात मकबूलशाह गंभीर जखमी झाला. 

रहाटगाव स्थित हॉटेलरहाटगाव स्थित एका हॉटेलमध्ये २४ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. अक्षय सुनील इंगळे (२४, रा. दीपकनगर) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. १८ मार्च रोजी रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. नांदगाव पेठ पोलिसांनी राहुल विठ्ठलराव इंगळे (२८, रा. अर्जुननगर) विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. अक्षय इंगळे हा मित्रांसमवेत रहाटगाव स्थित एका हॉटेलमध्ये जेवण करण्यास गेला होता. राहुल याचा काउंटरवर वाद चालला होता. यादरम्यान अक्षयच्या ग्लासमध्ये काचेचा तुकडा पडल्याने तो गेला. त्यावेळी आरोपी हा चाकू घेऊन बाहेर आला व त्याने अक्षयच्या पोटावर चाकूने वार केले. अक्षयला काही मित्रांनी तातडीने इर्विनमध्ये हलविले. सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहन चोखट यांनी इर्विन गाठून जखमीचे बयाण नोंदविले.

ट्रान्स्पोर्टनगरात चाकुहल्ला ट्रान्सपोर्टनगर येथील आइस्क्रीम पार्लरजवळ शोएब परवेज अ. रशीद (३४, रा. जमील कॉलनी) याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. १८ मार्चला रात्री ८.३५ च्या सुमारास डाव्या पायासह पाठीवर चाकूने वार करण्यात आले. शोएब परवेज हा ट्रान्स्पोर्ट मार्केटमध्ये चहा घेण्याकरिता गेला होता. त्याचा मित्र वाहन चालवित असताना तेथेच उभे असलेल्या काहींमधून खालिद पहिलवान व सै. आसिफ याने शोएबला शिवीगाळ केली, तर रफीक पहिलवानने शोएबला जिवे मारण्याच्या उद्देशाने चाकूने हल्ला चढविला. गाडगेनगर पोलिसांनी १९ मार्चला पहाटे शोएब परवेजच्या तक्रारीवरून रफीक पहिलवान, खालिद पहिलवान, इमरान मामू व सै. आसिफ (सर्व, रा. पठाण चौक) विरुद्ध गुन्हा दाखल केला.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी