शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

'प्रिव्हेंटिव्ह' मुळे क्राइम रेट घसरला; २,५८६ एफआयआर

By प्रदीप भाकरे | Published: September 16, 2024 12:37 PM

गतवर्षीच्या तुलनेत ५८० ने कमी : डिटेक्शन रेट ७० टक्क्यांवर

प्रदीप भाकरे लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहर पोलिस आयुक्तालयातील दहा पोलिस ठाणी व सायबर पोलिस ठाण्यात यंदाच्या जानेवारी ते ऑगस्टदरम्यान एकूण २,५८६ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. याच काळात गतवर्षी ती संख्या तब्बल ३,१६६ अशी होती. अर्थात यंदा क्राइम रेट घसरला असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५८० गुन्ह्यांची घट नोंदविली गेली आहे. एकूण २५८६ पैकी १८०० अर्थात ७० टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे.

गुन्हा झाल्यानंतर आरोपींना पकडण्यासोबत तो घडण्यापूर्वी कुख्यातांवर प्रतिबंध घातल्याने, प्रतिबंधात्मक कारवाई केल्याने क्राइम रेट गतवर्षीच्या तुलनेत घटल्याचे गुन्ह्याच्या सांख्यिकीवरून दिसून येतो. पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी क्राइम कंट्रोलसाठी 'प्रिव्हेंटिव्ह'च्या आयुधाचा प्रभावी वापर केला आहे. 

त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदादेखील चोरी, घरफोडी, दुचाकी चोरी, फसवणूक, दुखापत, विनयभंग, गंभीर व किरकोळ अपघात, दरोडा, विश्वासघात, प्राणांतिक अपघात, दंगलीच्या गुन्ह्यात घट झाली आहे. सन २०२३ च्या जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत एकूण ३१६६ गुन्हे दाखल झाले होते. पैकी ७० टक्के अर्थात २२२१ गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला.

शरीराविरुद्धच्या गुन्ह्यात घटप्रभावी प्रतिबंधात्मक कारवाईमुळे शरीराविरुद्धच्या गुन्ह्यात मोठी घट आली आहे. यंदा जानेवारी ते ऑगस्टदरम्यान त्याप्रकारचे ३९० गुन्हे घडले. पैकी ३६१ गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आली. त्या घटनांचा उलगडा करण्यात आला, तर गतवर्षी ४७६ गुन्हे दाखल झाले होते. 

चोरीचे प्रमाण २६३ ने घटलेगतवर्षी चोरीचे ८१४ गुन्हे नोंदविण्यात आले. तर, यंदा चोरीचे एकूण ५५१ एफआयआर झालेत. चोरीतील डिटेक्शनचे प्रमाण अन्य गुन्ह्यांच्या तुलनेत कमी असल्याने सीपींनी त्या-त्या पोलिस ठाण्यातील डीबी पथकाइसह क्राइम बॅचचीदेखील कानटोचणी केली.

विनयभंगात मोठी कमी महिला सुरक्षेसंदर्भात महिला सेल अधिक अॅक्टिव्ह करण्यात आला. दामिनी पथके २४ बाय ७ तैनात करण्यात आली. सोबतच, शाळा कॉलेजात विद्याथ्यांचे समुपदेशन सुरू करण्यात आले. सायबर सुरक्षेचे धडे देण्यात आले. पोलिस आयुक्तांपासून पोलिस उपनिरीक्षक व महिला अंमलदार त्यात सहभागी झालेत.

नोंद गुन्हे                            सन २०२४                       सन २०२३ खून                                             १९                                १४खुनाचा प्रयत्न                               ३६                                ३४बलात्कार                                    ३६                                ३५रॉबरी                                          ४७                                ६१चोरी                                           ५५१                              ८१४विश्वासघात                                  १०४                               १२५फसवणूक                                   ८६                                 ७५खोडसाळपणा                             ३९०                               ४७६शासकीय कामात अडथळा          १०३                                १९८       दुखापत                                      ३९०                                ४७६विनयभंग                                     १०३                                १९८

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती