शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

निर्जन स्थळ बनू पाहत आहेत गुन्हेेगारांचे अड्डे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 4:14 AM

असाईनमेंट अमरावती : अलीकडे शहरातील काही निर्जन स्थळे गुन्हेगारीचे अड्डे बनू पाहत आहेत. दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणानंतर प्रत्येक ...

असाईनमेंट

अमरावती : अलीकडे शहरातील काही निर्जन स्थळे गुन्हेगारीचे अड्डे बनू पाहत आहेत. दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणानंतर प्रत्येक शहरातील निर्जन स्थळांचा शोध घेण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले. त्या निर्जन स्थळांचा शोध घेऊन त्या ठिकाणी पोलिसांची गस्तदेखील सुरू झाली. त्यामुळे अनेक भुरटे व गुन्हेगारांनी आपले अड्डे बदलविले असून त्यांनी अलीकडे नवी व दूरवरची निर्जन स्थळे शोधून काढली आहेत.

शहरातील गुन्हेगारी आटोक्यात असली तरी अशा निर्जन स्थळांवर नव्याने गुन्हेगारीचा उदय होत असल्याने त्या ठिकाणी रात्रकालीन गस्त घालण्याची गरज निर्माण झाली आहे. रात्री-अपरात्री निर्जनस्थळी बसून गांजा, दारू रिचवली जाते. अशा ठिकाणी पोलिसांचा नव्याने वॉच राहणार आहे. शहरातील काही निर्जन स्थळी गतकाळात बलात्काराच्या घटनादेखील घडल्या आहेत.

///////////

शहरातील महिला अत्याचाराच्या घटना

वर्ष : घटनांची संख्या

२०१८ : ७९

२०१९: ८०

२०२० : ८१

२०२१ : ६९

//////////////

पोलिसांकडे संवेदनशील स्थळांची यादी

ज्या निर्जन स्थळांवर महिला अत्याचाराच्या घटना घडल्या, त्या ठिकाणांसह अन्य संवेदनशील स्थळांची यादी पोलिसांकडे आहे. त्या ठिकाणी रात्रकालीन पोलीस गस्तीसह दामिनी पथकाची दैनंदिन गस्त आहे. टवाळखोरांना हटकले जाते. मात्र, पोलिसांची नजर चुकविण्यासाठी काहींनी नवी निर्जन स्थळे शोधून काढली आहेत.

///////

येथे हवी पोलिसी गस्त, दामिनी पथकाची नजरही

टवाळखोर व गुन्हेगारांनी लक्ष्य केलेल्या अनेक जागांवर पोलीस गस्त घालत असतात. मात्र, कोंडेश्वर मंदिरापुढील जंगलाकडे जाणारा परिसर गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनू पाहत आहे. तेथे पोलिसांच्या रात्रकालीन गस्तीसह दामिनी पथकाचा वॉच आवश्यक आहे.

००००००००००००

ही ठिकाणे धोक्याचीच

कोंडेश्वर जंगल

कोंडेश्वर मंदिराच्या पुढ्यात मोठे जंगलव्याप्त क्षेत्र आहे. अनेक प्रेमीयुगुल तेथे प्रेमालापासाठी जात असतात. काही तरुण, तरुणींना तेथे लुटण्याचे प्रकारदेखील घडले आहेत. मात्र, बदनामीपोटी कुणी तक्रार करण्यास धजावत नाही.

//////////

अकोली रेल्वे स्थानक परिसर

अकोली रेल्वे स्थानक परिसर रात्रीच्या वेळी निर्मनुष्य असतो. त्या भागाला लागून जंगलक्षेत्रदेखील आहे. त्या भागातील विशिष्ट क्षेत्रात गांजा, दारू पिणाऱ्यांचा मोठा वावर असतो. अलीकडेच तेथे ‘डान्सिंग कार’चा प्रकार उघड झाला होता.

////////////

अंबिकानगर शाळेचे मैदान

अंबिकानगर महापालिका शाळेला मोठे क्रीडांगण लाभले आहे. ती शाळा जीर्णावस्थेत पोहोचली आहे. त्या शाळा परिसरात रात्री-अपरात्री गर्दुल्यांचा राबता असतो. दोन वर्षांपूर्वी तेथे एका दारूच्या वादातून एका तरुणाचा खूनदेखील झाला होता.

/////////////

रात्रकालीन गस्त प्रभावी

निर्जन स्थळांबरोबरच संपूर्ण आयुक्तालय क्षेत्रात रात्रकालीन गस्त घातली जाते. दामिनी पथक व त्या-त्या पोलीस ठाण्याची पथके दिवसभर गस्तीवर असतातच. महिला सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा कटिबद्ध आहे.

- डाॅ. आरती सिंह, पोलीस आयुक्त, अमरावती