लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बीटी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा अटॅक झाल्यामुळे उत्पादनात घट आली. त्यामुळे शेतकऱ्यांना दुय्यम दर्जाचे बियाणे विकणाºया कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, यासह शेतकऱ्यांना हेक्टरी ७० हजार रूपये सरसकट मदत द्यावी, अशी मागणी आ. रवि राणा यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर निवेदनात केली.यंदाच्या हंगामात अपुऱ्या पावसाने पीक उद्ध्वस्त झाले. यामधून काहीअंशी बचावलेल्या कपाशीवर आता गुलाबी बोंडअळीचा अटॅक झाल्यामुळे संपूर्ण कपाशीच धोक्यात आली. यामुळेच शेतकरी आर्थिक अडचणीत आला. बियाणे कंपन्यांनी दुय्यम दर्जाची बियाणे शेतकऱ्यांना विकल्यामुळेच संकट ओढावले आहे. संत्राची आंबिया बहराची मोठ्या प्रमाणात गळ झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ७० हजार रूपयांची मदत करावी, बियाणे कंपनीवर गुन्हे दाखल करावेत बोगस कंपन्यांकडून भरपाई वसूल करावी व हमीभावात वाढ करावी, अशी मागणी आ. राणा यांनी केली.
'त्या' बोगस बियाणे कंपन्यांवर गुन्हे नोंदवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 12:34 AM
बीटी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा अटॅक झाल्यामुळे उत्पादनात घट आली. त्यामुळे शेतकऱ्यांना दुय्यम दर्जाचे बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, यासह शेतकऱ्यांना हेक्टरी ७० हजार रूपये सरसकट मदत द्यावी,
ठळक मुद्देरवि राणांची मागणी : हेक्टरी ७० हजार अनुदान द्या