अमरावती: अडीच महिन्याच्या कालावधीनंतर आता पीक विमा मिळाला, यामध्ये पीक विमा कंपनीने शेतकऱ्याची थट्टा आरंभली आहे. अगदी १० रुपयांपासून परतावा मिळाल्याने संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांनी पीक विमा कंपनीचे कार्यालयात तोडफोड केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. पीक विमा कंपनी जिल्हाधिकारी, कृषी विभागासह कुणाचेच जुमानत नाही, शेतकऱ्यांच्या पीक विमा संदर्भात विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देतात, त्यामुळे या कार्यकर्त्यांनी कंपनी प्रतिनिधीला जाब विचारला.
जिल्ह्यात किमान चार लाख हेक्टरमधील खरीप पिकांचे नुकसान झाल्यानंतर विम्याचा हप्ता भरला तेवढीही भरपाई मिळाली नसल्याने धामणगाव मतदारसंघ प्रमुख कपील पडघान, अल्ताफ पठाण, चेतन परमुदे, प्रवीण गायनर आदिंनी पीक विमा कार्यालयावर धडक दिली, आठ दिवसात शेतकऱ्यांना वाढीव मदत न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा ईशारा कंपनीला देण्यात आलेला आहे.